Kartik Aaryan Kriti Sanon At Tajmahal : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) सध्या त्यांच्या आगामी 'शेहजादा' (Shehzada) सिनेमामुळे चर्चेत आहेत. सध्या या सिनेमाचं ते जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतचं सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान कार्तिकने क्रितीसोबत आग्राच्या ताजमहालाला भेट दिली आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
'शेहजादा'च्या प्रमोशनसाठी कार्तिक Aपोहोचला ताजमहालात!
कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो ताजमहालासमोर उभा असलेला दिसत आहे. ताजमहाल हे प्रेमाचं प्रतीक आहे. त्यामुळे कार्तिकने ताजमहालासमोर क्रितीसोबत रोमॅंटिक पोझ देत फोटो काढला आहे. हा फोटो शेअर करत कार्तिकने लिहिलं आहे, "शेहजादा, ताज आणि मुमताज".
कार्तिकच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहिलं आहे,"शेहजादा त्याच्या होणाऱ्या शेहजादीसोबत" म्हणजेच राजकुमार त्याच्या होणाऱ्या राजकुमारीसोबत. दुसऱ्याने लिहिलं आहे,"राजकुमार आणि राजकुमारी". तिसऱ्याने लिहिलं आहे,"आता एकमेकांसोबत लग्नचं करुन टाका".
10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'शेहजादा'
कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननचा 'शेहजादा' हा सिनेमा येत्या 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चाहते आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमात कार्तिकचा रोमॅंटिक अंदाजात दिसणार आहे. हा रोमॅंटिक सिनेमा असला तरी या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.
'शेहजादा' हा सिनेमा दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे यांच्या 'वैकुंठापुरमुलू' या तेलुगू सिनेमाचा रिमेक आहे. अनीस बज्मीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन, क्रिती सेनन आणि कियारा आडवाणी आणि तब्बू दिसणार आहे. फरहाद सामजी आणि आकाश कौशिकने या सिनेमाची कथा लिहिली आहे.
कार्तिक आर्यनचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमादेखील कार्तिक आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या सिनेमाचीदेखील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :