मुंबई : सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या आगामी 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत रोमान्स करताना दिसेल.
साराच्या पदार्पणबाबत तिची सावत्र आई अर्थात करीना कपूरने मौन सोडलं आहे. "सारा अजून तरुण आहे आणि सिनेमात तिचं करिअर उज्ज्वल आहे," असं करीना म्हणाली.
न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करीनाला साराविषयी प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने हे उत्तर दिलं.
करीना म्हणाली की, "सारा अतिशय हुशार आहे. अभिनय तर तिच्या जीन्समध्ये आहे. ती दिसायलाही अतिशय सुंदर आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, हुशारी आणि सौंदर्याच्या जोरावर ती बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालेल, यावर माझा विश्वास आहे."
दरम्यान, 'केदारनाथ'चं चित्रीकरण यंदा वर्षअखेरीस सुरु होईल. एकता कपूर ही या सिनेमाची निर्माती असेल.