Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 12 फेब्रुवारी रोजी 'एरो इंडिया 2023' चे उद्घाटन करण्यासाठी बेंगळुरू  (Bengaluru) येथे गेले होते. यावेळी राजभवनात त्यांनी साऊथ चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांची भेट घेतली.  ‘केजीएफ’ (KGF) फेम यश (Yash) आणि  'कांतारा' फेम  ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यांची भेट नरेंद्र मोदी यांनी घेतली.  ऋषभ शेट्टी नुकतेच नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


ऋषभ शेट्टीचं ट्वीट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन ऋषभ शेट्टीनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट प्रेरणादायी ठरली.  भारताला नवी दिशा देण्यासाठी मनोरंजन उद्योगाचे योगदान आणि प्रगतीशील कर्नाटक या विषयांवर चर्चा केली. #BuildingABetterIndia मध्ये योगदान दिल्याचा अभिमान आहे. तुमचे दूरदर्शी नेतृत्व आम्हाला प्रेरणा देते. '






क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद याने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. व्यंकटेश प्रसादनं पंतप्रधानांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'पंतप्रधानांना भेटून आनंद झाला, त्यांनी बेंगळुरू येथील राजभवनात माझ्या क्रिकेटमधील सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांनी भारतातील क्रीडाक्षेत्रातील पायाभूत सुविधा, ऑलिम्पिक आणि क्रीडा संस्कृती यासह विविध विषयांवर चर्चा केली.'






अभिनेता यशचे केजीएफ आणि केजीएफ-2 हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. तर अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केले. कांतारा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला आणि चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Salman Khan : "मी माझ्या मर्जीनं अविवाहित राहिलो नाही"; 'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खानच्या वक्तव्याने वेधलं चाहत्यांचं लक्ष