मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि 'क्वीन' अभिनेत्री कंगना रनौत यांच्यातील कथित प्रेमसंबंधांची चर्चा चवीने चघळण्यातच इतरांनी धन्यता मानली. आपलं वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणून दिलेल्या मानसिक त्रासाबद्दल हृतिकने माफी मागावी, अशी जाहीर मागणी कंगनाने केली आहे.


रजत शर्मा यांनी 'आप की अदालत'चा टीझर शेअर केला असून त्यामध्ये कंगनाने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केल्याची शक्यता आहे.

'त्याला इकडे बोलवा आणि एक-एक प्रश्न विचारा. कारण मी नोटीस नव्हती पाठवली. मी इतकी मानहानी सहन केली आहे, की त्याचा ताळेबंदच लागणार नाही. मी रात्रभर रडत बसायचे आणि मला झोप यायची नाही. मला ताण आला, माझ्यावर मानसिक आघात झाले. माझ्या नाव्यावर वाह्यात मेल्स जाहीर केले. आजही ते मेल लोक गूगल करुन वाचतात आणि मजा घेतात. या गैरवर्तनासाठी माझी माफी मागावी' असं कंगनाने टीझरमध्ये म्हटलं आहे.

https://twitter.com/RajatSharmaLive/status/902814203613872128

'मी त्या माणसावर खरंच मनापासून प्रेम केलं होतं. एखाद्या प्रियकरासाठी आपण ज्याप्रकारचे नज्म किंवा शायरी लिहितो, तशा भावना मी व्यक्त केल्या. तर त्याने त्या जगजाहीर करुन माझी बदनामी केली. हा म्हणजे दुसरा मृत्यू आहे' असं म्हणताना कंगनाचे डोळे पाणावले.

https://twitter.com/RajatSharmaLive/status/903143691950292996

कंगना आणि हृतिकने एकमेकांची मानहानी केल्याबद्दल कायदेशीर नोटिसा बजावल्या होत्या. फेक इमेल आयडी, हॅकिंग आणि कथित प्रेमसंबंध असे अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. हृतिकने याबाबत जाहीर वाच्यता करणं टाळलं असलं, तरी कंगनाने वेळोवेळी त्याच्यावर निशाणा साधला.

आपली प्रतिमा खराब केल्याप्रकरणी ह्रतिक रोशनने कंगनाला नोटीस बजावली, तर कंगनाने ह्रतिक रोशनच्या नोटिशीला उत्तरादाखल आणखी एक नोटीस पाठवली. वकील रिझवान सद्दिकी यांच्या मार्फत कंगनाने ऋतिक रोशनला 21 पानांची नोटीस पाठवली आहे. ऋतिकने आपल्याला धमकावल्याचा आरोप या नोटिशीमधून कंगनाने केला आहे.