Kalki Part 2 : अभिनेता प्रभास (Prabhas), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachachan) स्टार बहुचर्चित चित्रपट कल्कि 2898 एडी (Kalki 2898 AD) बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरला. या चित्रपटाने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली. कल्कि चित्रपटाने प्री-बुकींगपासूनच वेगवेगळे विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. कल्कि चित्रपटाचा पहिला भाग पाहिल्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
कल्कि चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा
कल्कि 2898 एडी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. नाग अश्विन दिग्दर्शित कल्की 2898 AD च्या पहिल्या भागाने आपल्या अनोख्या कथा आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आता निर्माते या चित्रपटाच्या पुढील अंतिम भागाची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये कल्किचा सिक्वेल पाहण्याची आतुरता वाढत चालली आहे. प्रभास आणि दीपिकासोबत चित्रपटाचा शेवटचा भाग आणखी भव्य असणार आहे.
कल्कीच्या दुसऱ्या भागावर काम सुरू
कल्की चित्रपटाच्या पुढील भागाबद्द्ल अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत होते. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाबाबत अनेक बातम्या समोर येत होत्या. कल्कि पार्ट 2 मध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणची भूमिका नसणार असं काहीचं म्हणणं होतं. मात्र, आता खुद्द प्रभासने याबाबत मोठा खुलासा केला आहे.
कल्कि 2 मध्ये दीपिकाची भूमिका नसणार?
अलीकडेच चित्रपटांच्या निर्मात्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रभासने चित्रपटाची टीम आणि कलाकारांचे आभार मानले आहेत. प्रभासने कल्कि चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर काम सुरू असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय, त्याने दीपिका पदुकोणचं खूप कौतुक केलं, तसेच पुढील चित्रपटात दीपिका पदुकोणचीही मोठी भूमिका असणार असल्याचं प्रभासने सांगितलं.
कल्की पार्ट 2 मध्ये दीपिका दिसणार नाही?
व्हिडीओमध्ये प्रभास दीपिकाचं कौतुक करताना म्हणत आहे, 'दीपिकाचे खूप खूप आभार, ती खूप सुंदर महिला आहे आणि चित्रपटाचा दुसरा भाग आणखी मोठा असणार आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. दिग्दर्शक नाग अश्विननेही पहिल्या चित्रपटात दीपिकाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला होता, तसेच दीपिकाची व्यक्तिरेखा कथेचा केंद्रबिंदू असल्याचेही स्पष्ट केलं होतं. नाग अश्विन म्हणाला होता, 'दीपिका कथेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण तिचं पात्र काढून टाकलं तर, कथा टिकणार नाही, कल्की राहणार नाही.'
पुढचा भाग एक अप्रतिम सिनेमॅटिक अनुभव
शेवटच्या भागात प्रभास आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र येत असल्याने चित्रपटाचा सिनेमॅटिक अनुभव आणखीनच अप्रतिम असणार आहे. कल्कीचे निर्माते या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची तयारी करत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना कल्किच्या पहिल्या भागापेक्षा अधिक थरारक अनुभव मिळणार आहे.