Kalki 2898 AD Worldwide Box Office Collection :   नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी'  (Kalki 2898 AD) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचा दुष्काळ संपवला असून पैशांचा पाऊस पाडला आहे. या साय-फाय चित्रपटाने देशातच नव्हे तर परदेशी बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरात जबरदस्त ओपनिंग केली होती आणि यानंतर त्याच्या पहिल्या वीकेंडमध्येही 'कल्की 2898 एडी'ने बॉक्स ऑफिसवर जगभरात रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी जगभरात चांगली कमाई केली आहे. 


'कल्की 2898 एडी'ने चौथ्या दिवशी किती कमाई केली?


ॲक्शन सिक्वेन्सपासून ते VFX आणि 'कल्की 2898 एडी' ची चमकदार स्टार कास्ट प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करत आहे. 600 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाची दररोज बंपर कमाई होत आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी, चित्रपटाने शनिवारच्या तुलनेत जगभरात कमाईत 20 टक्क्यांची वाढ दर्शविली. या चित्रपटाने रविवारी जगभरातील बॉक्स ऑफिसवर सुमारे 120 कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी या सायन्स फिक्शन चित्रपटाने जगभरात 100 कोटींची कमाई केली होती.


'कल्की 2898 एडी'ने चार दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. परदेशात या चित्रपटाने चार दिवसात 150 कोटींची कमाई केली. या आठवड्यात हा चित्रपट 500 कोटींचा टप्पा पार करेल आणि बजेटही वसूल करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


'कल्की 2898 एडी'ची चार दिवसाचे वर्ल्डवाईड कलेक्शन किती?


कल्की 2898 एडीने वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 191 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 96 कोटी, तिसऱ्या दिवशी 100 कोटी, चौथ्या दिवशी 120 (अंदाजे) कमाई केली. 


500 कोटींचा जलद टप्पा ओलांडणारे चित्रपट


'कल्की 2898 एडी' हा बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा पार करणारा सहावा सर्वात जलद भारतीय चित्रपट ठरला आहे. जगभरात 507 कोटी रुपयांसह, त्याने 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे आणि एकूण कमाईमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. 


> RRR: 3 दिवसात 570 कोटींची कमाई
> KGF: चॅप्टर 2: चार दिवसांत 546 कोटींची कमाई
> पठाण : पाच दिवसांत 542 कोटींचे कलेक्शन
> जवान : चार दिवसांत 521 कोटींचा व्यवसाय
> बाहुबली 2: 3 दिवसात 510 कोटींचे कलेक्शन
> कल्की 2898 एडी- चार दिवसांत 507 कोटींची कमाई


'कल्की 2898 एडी'ने या चित्रपटांचे तोडले विक्रम


'कल्की 2898 एडी' बॉक्स ऑफिसवर दररोज विक्रम रचत आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यापैकी या चित्रपटाने केवळ चार दिवसांतच हिंदी व्हर्जनमध्ये 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 


'कल्की 2898 एडी'ने या वर्षी रिलीज झालेले 'मुंज्या' 'क्रू', 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' आणि 'आर्टिकल 370' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईपेक्षा अधिक कमाई केली आहे.  चार दिवसांत 'कल्की 2898 एडी'ची हिंदी भाषेतील कमाई 110.5 कोटी रुपये आहे. 'मुंज्या'ची 24 दिवसांची एकूण कमाई 95 कोटींच्या आसपास आहे.'क्रू'ने बॉक्स ऑफिसवर 90 कोटी, तेरी बातो में उलझा जिया या चित्रपटाने 87  कोटी आणि आर्टिकल 370 ने 84 कोटींची कमाई केली आहे.