Kalki 2898 AD BO Collection Day 4 : टी-20 वर्ल्डकप शनिवारी संपल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे आपला मोर्चा वळवला. रविवारी, 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. प्रभासच्या या साय-फाय चित्रपटाने चौथ्या दिवशी चांगली कमाई करत काही चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडीत काढले आहेत. 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट गुरुवारी, 27 जून रोजी रिलीज झाला होता. 


'कल्की 2898 एडी'ने किती कमाई केली?


साय-फाय चित्रपट 'कल्की 2898 एडी' ने बॉक्स ऑफिसवर आपली हुकूमत निर्माण केली आहे.  या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांना वेड लावत असून यासोबतच चित्रपटगृहेही प्रेक्षकांनी खचाखच भरलेली पाहायला मिळत आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे चार दिवस झाले असून आतापर्यंत आपले किमान निम्मं बजेट वसूल केले असल्याचे म्हटले जात आहे. 


रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग केली होती आणि तेव्हापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे आणि अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत आहे. तेलगू नंतर हिंदी भाषेत 'कल्की 2898 एडी' ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.


या चित्रपटाने हिंदी व्हर्जनमध्ये दमदार कलेक्शन केले आहे. हिंदी भाषेतील 'कल्की 2898 एडी'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने देशभरात 95.3 कोटी रुपयांची कमाई केली होती.  त्यापैकी एकट्या हिंदीमध्ये या चित्रपटाने 22.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 57.6 कोटी रुपयांची कमाई केली, त्यापैकी एकट्या हिंदीमध्ये या चित्रपटाने 23 कोटी रुपये कमावले, तर तिसऱ्या दिवशी 'कल्की 2898 एडी'ने एकूण 64 कोटी रुपयांची कमाई केली, त्यापैकी चित्रपटाने कमाई केली. एकट्या हिंदीत 26 कोटी रुपये केले. आता रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे आले आहेत.


सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'कल्की 2898 एडी'ने  चौथ्या दिवशी, रविवारी 85 कोटींची कमाई केली. त्यात हिंदी व्हर्जनचा वाटा 39 कोटींचा आहे. 


प्राथमिक अंदाजानुसार, 'कल्की 2898 एडी'ने चार दिवसात 302.4 कोटींची कमाई केली आहे. हिंदी भाषेतील चित्रपटाने चार दिवसात 110.5 कोटींची कमाई केली आहे.


'कल्की 2898 एडी'ने या चित्रपटांचे तोडले विक्रम


'कल्की 2898 एडी' बॉक्स ऑफिसवर दररोज विक्रम रचत आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यापैकी या चित्रपटाने केवळ चार दिवसांतच हिंदी व्हर्जनमध्ये 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 


'कल्की 2898 एडी'ने या वर्षी रिलीज झालेले 'मुंज्या' 'क्रू', 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' आणि 'आर्टिकल 370' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईपेक्षा अधिक कमाई केली आहे. 


चार दिवसांत 'कल्की 2898 एडी'ची हिंदी भाषेतील कमाई 110.5 कोटी रुपये आहे. 'मुंज्या'ची 24 दिवसांची एकूण कमाई 95 कोटींच्या आसपास आहे.'क्रू'ने बॉक्स ऑफिसवर 90 कोटी, तेरी बातो में उलझा जिया या चित्रपटाने 87  कोटी आणि आर्टिकल 370 ने 84 कोटींची कमाई केली आहे.