Junior Mehmood Battling From Cancer:  अभिनेता ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) हे सध्या कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये आहे. ज्युनियर महमूद गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. या काळात त्यांचे वजन अचानक कमी होऊ लागले, त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली आणि नोव्हेंबरमध्येच त्यांना कॅन्सरचे निदान झाले. ज्युनियर मेहमूद  यांचे जवळचे मित्र सलाम काझी यांनी याबाबत माहिती दिली.


2 महिन्यांपासून आजारी होते ज्युनियर मेहमूद


एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सलाम काझी म्हणाले, "ज्युनियर मेहमूद हे 2 महिन्यांपासून आजारी होते आणि सुरुवातीला आम्हाला वाटले की, त्यांना आरोग्याच्या संबंधित काही किरकोळ समस्या असेल पण त्यानंतर अचानक त्यांचे वजन कमी होऊ लागले आणि जेव्हा वैद्यकीय अहवाल आला तेव्हा त्यात त्यांना कर्करोग असल्याचे सांगण्यात आले.  त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र हा स्टेज फोर कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले."  सलाम काझी यांनी असंही सांगितले की, ज्युनियर महमूद यांच्या फुफ्फुसात आणि शरीरात कर्करोग पसरला आहे.  सध्या ते घरीच उपचार घेत आहे. 


जॉनी लीव्हरने केली विचारपूस


ज्युनियर मेहमूद यांचा असलेला अभिनेता जॉनी लीव्हरने नुकतीच  ज्युनियर मेहमूद यांची भेट घेतली आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. जॉनी लीव्हर आणि ज्युनियर मेहमूद यांच्या  भेटीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ज्युनियर महमूद हे बेडवर झोपलेले दिसत आहेत. ते खूपच अशक्त दिसत आहे. अशा परिस्थितीत जॉनी लीव्हर त्यांना  धैर्य देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर स्माईल दिसत आहे.






अनेक हिट चित्रपटांमध्ये ज्युनियर मेहमूद यांनी केलं काम


 ज्युनियर महमूद यांचे खरे नाव नईम सय्यद असं आहे. त्यांनी विविध भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ब्रह्मचारी (1968), मेरा नाम जोकर (1970), परवरिश (1977), आणि दो और दो पांच (1980) यांसारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे. आता  ज्युनियर महमूद यांच्या प्रकृतीबद्दल  त्यांचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. 


संबंधित बातम्या


CID चे इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडनिस यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल