Money Heist : नेटफ्लिक्सवरील स्पॅनिश वेब सीरिज 'मनी हाईस्ट'ने (Money Heist) प्रेक्षकांची मनं जिंकली. अशातच हैदराबाद पोलिसांनी 'मनी हाईस्ट' वेबसीरिज पाहून अपहरण करणाऱ्या टोळीला अटक केली आहे.  ही टोळी खंडणीसाठी लोकांचे अपहरण करायची. 


इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सवरील सर्वात जास्त वेळा पाहिली गेलेली वेब सीरिज 'मनी हाईस्ट' आहे. या वेबसीरिजच्या एका चाहत्याने पाच जणांची एक टोळी तयार केली आणि लोकांचे अपहरण केले आहे. टोळी तयार करणाऱ्या 'मनी हाईस्ट'च्या चाहत्याचे नाव सुरेश असे आहे. 


सुरेश आणि त्याची टोळी काय काम करायची?
महिलांसह काही लोक निरपराध लोकांचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांना धमकावून सहज पैसे कमवतात. विश्वास संपादन करण्यासाठी सोशल मेसेजिंग अॅप्सद्वारे व्हॉइस मेसेज, टेक्स्ट मेसेज पाठवतात. पीडित महिलांना आमिष दाखवून फसवले जात असल्याने त्यांनी तक्रार केलेली नाही.





प्रोफेसर, बर्लिन, टोकियो, रकेल, रिओ आणि डेनव्हर्ट या मनी हाईस्टमधील पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मनी हाईस्टचे पाच सिझन प्रदर्शित करण्यात आले आहेत. 


संबंधित बातम्या


Mika Singh : मिका सिंहकडून बप्पीदांना सांगीतिक श्रद्धांजली, गाण्यांमधून दिला ‘गोल्डन सिंगर’च्या आठवणींना उजाळा!


Devednra Fadnavis, Amruta Fadnavis  : काय म्हणता? देवेंद्र फडणवीस पातेलंभर तुपासकट 30 ते 35 पोळ्या खायचे, अमृता फडणवीसांनीच सांगितलं...


Dadasaheb Phalke Death Anniversary : दादासाहेब फाळकेंच्या ‘हलत्या चित्रां’चं स्वप्न पुढे मनोरंजन विश्व बनलं! जाणून घ्या त्यांच्या प्रवासाबद्दल...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha