Hum Do Humare Do Trailer Release : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon)चा 'हम दो हमारे दो' या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात राजकुमार राव आणि कृती सेननसह परेश रावल, रत्ना पाठकर शाह, अपारशक्ति खुराना, मनुऋषि चड्ढा आणि प्राची शाह दिसून येणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर खूप मजेशीर दिसून येत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना विश्वास आहे, ट्रेलरसारखाच सिनेमादेखील प्रेक्षकांना आवडणार आहे. 


ट्रेलरमध्ये कृती सेनन आणि राजकुमार रावच्या जोडीला चाहत्यांची पसंती मिळते आहे. राजकुमार राव लग्नासाठी आई वडिलांचा शोध घेत आहेत. तेच अपारशक्ती खुरान त्याचवेळी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करते आहे. चित्रपटातील परेश रावल आणि रत्ना पाठकरची भूमिका देखील खास आहे. परेश रावल चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. या विनोदी - रोमॅंटिक सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक जैनने केले आहे तर दिनेश विजनच्या हाउस मैडॉक प्रोडक्शन हाउसने सिनेमाची निर्मिती केली आहे. 


नुकताच प्रदर्शित झाला होता सिनेमाचा टीजर
'हम दो हमारे दो' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीजरमध्ये दाखविण्यात आले आहे की, कृती राजकुमारला म्हणते, तिचे आई-वडील राजच्या आई-वडिलांना भेटण्यास इच्छूक आहेत. पण राजचे आई-वडील कोण आहेत हे त्याला माहीत नाही. त्यामुळे राज त्याच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळेस त्याला रत्ना पाठक शाह आणि परेश रावल भेटतात. हा चित्रपट लवकरच डिजनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा दिवाळीत धमाका करणार आहे. 


या दिवशी होणार 'पुष्पा' सिनेमा प्रदर्शित
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिलचा 'पुष्पा' सिनेमा 17 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपटाचा दुसरा भाग 2022 सालात प्रदर्शित करण्यात येणार आहे. "पुष्पा - द राइज" सिनेमातील पहिले गाणे 'जागो जागो बकरे' प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर अल्पावधीतच या गाण्याने सगळे रेकॉर्ड ब्रेक केलं होता. आता या चित्रपटातील दुसरे गाणे 'श्रीवल्ली' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'श्रीवल्ली' गाणे 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. जावेद अली यांनी हिंदीत तर सिड श्रीराम यांनी तेलगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळममध्ये गायलेले आणि देवी प्रसाद यांनी संगीतबद्ध केलेले हे मधूर गाणे असणार आहे. 


जाणून घ्या "हे"  चित्रपट कधी होणार प्रदर्शित
जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते 2 सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुनील शेट्टीची मुलगी अहाना शेट्टीचा चित्रपट 'तडप' 3 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' 19 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगन, रकुलप्रीत आणि अमिताभ बच्चनचा'May Day' 29 एप्रिल 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुरचा 'जर्सी' सिनेमा 31 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. रणवीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त 'शमशेरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा 18 मार्च,2022 ला प्रदर्शित होणार आहे.