Rohit Roy: अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) काबिल (Kaabil) हा चित्रपट  2017 मध्ये रिलीज झाला. अनेकांनी या चित्रपटाच्या कथानकाचं कौतुक केलं.अभिनेता रोहित रॉयनं देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारली होती. नुकताच रोहित रॉयनं एका मुलाखतीमध्ये काबिल चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा किस्सा सांगितला होता. त्यानं सांगितलं की,  हृतिक रोशननं काबिल चित्रपटाचे शूटिंग थांबवले होते. 


सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता रोहित रॉयने सांगितलं की,  “हृतिक असा अभिनेता आहे जो स्वत: कसा दिसतोय किंवा समोरची व्यक्ती कशी दिसत आहे,  याचा विचार करत नाही. प्रेक्षक मोठ्या पडद्यावर पाहतील तेव्हा कसे दिसेल याचा तो विचार करतो,” रॉयने शेअर केले.


रोहित रॉयने सांगितलं की, एका अॅक्शन सीनमध्ये तो रॉडने आदळल्यानंतर  जमिनीवर पडणार होता. तेव्हा सेटवर येताच हृतिकनं रोहित रॉयच्या क्रॅश मॅटबद्दल विचारले आणि नंतर तो म्हणाला ‘क्रॅश मॅट? पण तू डील फॉल करत आहेस, बरोबर?' रोहित रॉय म्हणाला 'हो.' थोड्याच वेळात त्याने डायरेक्शन टीमला बोलावले. त्या दिवशी, अॅक्शन टीम पॅकअप करून निघून गेली होती. त्यानंतर तो रोहित  रॉयला म्हणाला, "रोहित, शॉट देऊ नकोस."


रोहित रॉयने सांगितलं की, जरी हृतिक रोशन चित्रपट निर्माते राकेश रोशन यांचा मुलगा असला, तरीही त्याने  सुरक्षेसाठी भूमिका घेतली. त्याने त्याच्या सहाय्यकाला त्याच्या व्हॅनमध्ये पाठवले आणि सांगितले, 'माझी क्रॅश मॅट घ्या आणि ती व्यवस्थित ठेवा नाहीतर रोहित शॉट देणार नाही. लोक हृतिक रोशनच्या चांगल्या लूकबद्दल बोलतात पण तो माणूस देखील चांगला आहे आहे. हेच मला काबिलच्या शूटिंग दरम्यान कळालं'


रोहित रॉयने  सांगितलं की, काबिल चित्रपट रिलीज झाला, तेव्हा त्याचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर हृतिक रोशनने त्याच्यासाठी एक घड्याळ पाठवले होते.






यामी गौतम,गिरीश कुलकर्णी,रोनित रॉय या कलाकारांनी देखील काबिल या चित्रपटामध्ये काम केले होते. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.


संबंधित बातम्या


Box Office Collection : मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून रजनीकांत, सनी देओल भारावले; 'Gadar 2' अन् 'Jailer'ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई!