मुंबई : सुप्रसिद्ध गायक अर्जित सिंहला (Arijit Singh) कॉपीराईट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. अर्जितचं गाणं, त्याचा आवाज, त्याची स्टाईल आणि त्याच्या व्यक्तिमत्वःशी निगडीत कोणतीही गोष्ट कॉपी करण्यास हायकोर्टानं मनाई करण्यात आली आहे. एखाद्या कलाकराच्या व्यक्तिगत गोष्टींवर घाला घालण, ही बाब अतिशय आहे. व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य एखाद्याच्या कलेचा स्वत:च्या स्वार्थासाठी गैरवापर करणं योग्य नाही, असं स्पष्ट मत हायकोर्टानं व्यक्त केलंय.
गायक अर्जित सिंहला हायकोर्टाचा मोठा दिलासा (Arijit Singh Copyright Case)
न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठानं हे अंतरिम आदेश जारी करत याप्रकरणावरील पुढील 6 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली आहे. अर्जित सिंहनं आपल्या अधिकारांच्या रक्षणासाठी हायकोर्टात याचिका दाखल करत अर्जितला कॉपी करुन पैसा कमवणाऱ्यांना याचिकेत प्रतिवादी केलं आहे.
काय आहे प्रकरण?
आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही. गायक होतानाच तसं आपण ठरवलं होतं. मात्र, हल्ली आपल्या गाण्यांची, आपल्या स्टाईलची कॉपी करुन अनेकजण पैसे कमवू लागले आहेत. तसेच आपल्या परवानगीशिवाय आपला फोटो असलेले टी-शर्ट, कॉफी मग, तसेच पेनवर वापरले जातात. तेव्हा या सर्व गैरवापरावर निर्बंध आणावेत, अशी मागणी अर्जित सिह यानं याचिकेतून केली आहे.
उच्च न्यायालयाने काय म्हटलं?
याप्रकरणी गायक अर्जित सिंह याला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अर्जित सिंहला दिलासा देताना म्हटलं आहे की, एआय टूल्स वापरुन कोणत्याही सेलिब्रिटीचा आवाज किंवा फोटो त्याच्या संमतीशिवाय वापरता येणार नाही. असे झाल्यास, ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे उल्लंघन असेल, असं करणं तात्काळ थांबवण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
गायक अर्जित सिंह (Arijit Singh) त्याच्या सुरेल आवाजासाठी जगभर प्रसिद्ध आहे. अर्जितने सर्व प्रकारच्या गाण्यांतून आपल्या मधूर आवाजाने जगाला वेड लागलं आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात त्यांच्या आवाजाचाही गैरवापर होत आहे. याविरोधात त्याने कोर्टात याचिका दाखल केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :