Hardik Pandya Natasa Stankovic : टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील विजयात मोलाची भूमिका बजावणारा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा आपल्या कौटुंबिक आघाडीवर अजूनही संघर्ष करत असल्याची चर्चा आहे. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री-मॉडेल नताशा स्टॅनकोविच (Natasa Stankovic) यांच्यात आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. दोघांनीदेखील यावर अधिकृत भाष्य केले नाही. या दरम्यान आता नताशाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतून नताशाने घटस्फोटाची हिंट दिली असल्याचे म्हटले जात आहे. 


अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविचने टीम इंडिया T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिकसाठी अभिनंदनाची पोस्ट शेअर न केल्यामुळे ट्रोल झाली होती. अशा परिस्थितीत आता बुधवारी नताशाने क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबतच्या तिच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या अफवांकडे लक्ष वेधले. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर असलेल्या व्हिडीओमध्ये नताशाने आपण एका विशेष परिस्थितीतून जात असल्याचे म्हटले आहे.


नताशाने व्हिडीओत काय म्हटले?


नताशाने तिच्या इन्स्टाग्राम  स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये नताशाने म्हटले की,''आज मी असं काही वाचण्यासाठी उत्सुक आहे जे आज मला ऐकण्याची अधिक गरज आहे. त्यामुळेच मी माझ्यासोबत बायबल घेऊन आली आहे. जेणेकरून तुम्हीदेखील हे वाचाल.  यामध्ये लिहिले आहे की, एक देव आहे जो तुमच्या आधी चालतो आणि तुमच्या सोबत राहील, तो तुम्हाला कधीही सोडणार नाही.  घाबरू नका किंवा निराश होऊ नका. जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून जात असतो, तेव्हा आपण निराश होतो, निराश होतो, दुःखी होतो. (परंतु) देव तुमच्या सोबत असतो. तुम्ही सध्या कोणत्या परिस्थितीमधून जात आहात, याबाबत तो कधीच हैराण होत नाही. त्याच्याकडे आधीच तुमच्यासाठी दुसरी योजना तयार असते असे नताशाने म्हटले. नताशाच्या या व्हिडीओवरून लोकांनी ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य करत असल्याचा अंदाज लोकांनी व्यक्त केला आहे. 



नताशाचे ट्रोलिंग....


टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आपले काही फोटो शेअर केले होते. यावर युजर्सने हार्दिकसाठी पोस्ट का लिहिली नाही असा सवाल केला.  


नताशा आणि हार्दिक यांचा विवाह 2020 मध्ये झाला होता. त्यानंतर या दोघांनी पुन्हा एकदा 2023 मध्ये पारंपरीक पद्धतीने लग्न केले होते. हार्दिक सोबतच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्यानंतर नताशाने इन्स्टाग्रामवरून आपले आडनाव हटवले.