Neha Dhupia Birthday : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धूपियाचा (Neha Dhupia) आज 42 वा वाढदिवस आहे. नेहाचा जन्म 27  ऑगस्ट 1980 रोजी झाला. नेहा ही माजी 'मिस इंडिया' आहे. 2002 मध्ये नेहानं 'मिस इंडिया' ही स्पर्धा जिंकली होती. नेहा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. नेहानं 1999 मधील राजधानी या  छोट्या पडद्यावरील मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.    


मिस युनिवर्स स्पर्धेत नेहा झाली सहभागी 
फेमिना मिस इंडिया आणि  फेमिना मिस इंडिया युनिवर्स या स्पर्धा जिंकल्यानंतर नेहानं मिस युनिवर्स स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील टॉप-10 स्पर्धांच्या यादीत नेहाच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर नेहानं अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 


2003 मध्ये बॉलिवूडमध्ये केली एन्ट्री 
नेहानं ‘कयामत : सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटात अजय देवगणसोबत काम करुन बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यानंतर 2004 मध्ये रिलीज झालेल्या जुली या चित्रपटात नेहानं काम केलं. शीशा,  क्‍या कूल हैं हम, हे बेबी, शूटआउट एट वडाला, दस कहानियां, सिंह इज किंग, रामा रामा क्‍या है ड्रामा, दे ताली, लस्‍ट स्‍टोरीज,  अ थर्सडे आणि सनक या चित्रपटांमध्ये नेहानं काम केलं. 


वक्तव्यांमुळे असते चर्चेत
रोडिज या शोमुळे नेहाला विशेष लोकप्रियाता मिळाली. या शोमधील नेहाचा 'इट्स हर चॉइस' हा डायलॉग फेमस झाला. नेहाचा नो फिल्टर नेहा हा शो चर्चेत असतो. या शोमध्ये नेहानं एक वक्तव्य केलं होतं की, 'मला या शोमध्ये शाहरुखला बोलवायचं आहे कारण इंडस्ट्रीमध्ये फक्त दोन गोष्टी विकल्या जाऊ शकतात. एक म्हणजे सेक्स आणि दुसरं म्हणजे शाहरुख खान' नेहाच्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. 


नेहाचे स्क्वॅशपटू ऋत्विक भट्टाचार्यसोबत सुमारे 10 वर्षे अफेअर होते आणि नेहाच्या चाहत्यांना वाटले की हे जोडपे लग्न करतील पण अचानक ते दोघे वेगळे झाले. यानंतर नेहाचे नाव युवराज सिंहसोबत जोडले गेले पण नेहानं याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. यानंतर नेहाचे नाव जेम्स सिल्वेस्टरसोबत जोडले गेले. त्यांचे नाते फार काळ टिकले नाही 3 वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर 2018 मध्ये नेहानं अंगद बेदीसोबत लग्नगाठ बांधली. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: