Happy Birthday Deepika Padukone: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) आज (5 जानेवारी) 37 वा वाढदिवस आहे. दीपिका तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. ये जवानी है दिवानीमधील नैना, ओम शांती ओममधील शांती प्रिया यांसारख्या दीपिकानं साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आज दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत. जाणून घेऊयात तिच्या संपत्तीबाबत....


दीपिकाची संपत्ती


दीपिकानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. ती एका चित्रपटाचे जवळपास 15 ते 30 कोटी रुपये मानधन घेते. रिपोर्टनुसार, दीपिका ही जवळपास 314 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. दीपिका अनेक प्रसिद्ध कंपन्यांची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. यासाठी ती जवळपास 7 ते 10 कोटींची फी घेते. दीपिकाकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत. तिच्याकडे ऑडी Q7, ऑडी A8, मिनी कन्वर्टिबल यांसारख्या गाड्या दीपिकाकडे आहेत. 


2022 मध्ये दीपिका या कारणांमुळे होती चर्चेत 


कान्स लूक


दीपिका कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये सहभागी झाली आहे. या फेस्टिव्हलची ती ज्युरी होती. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटसाठी नुकताच दीपिकानं क्लासी लूकमुळे चर्चेत होती. कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी दीपिकानं केलेल्या लूकमधील तिनं परिधान केलेल्या नेकलेसनं अनेकांचे लक्ष वेधले. या नेटकलेसची किंमत चार कोटी 48 लाख रूपये होती. हा नेकलेस 18 कॅरेट व्हाईट गोल्ड, एमराल्ड आणि डायमंडपासून तयार केलेला होता.  


फिफा वर्ल्ड कप (fifa world cup final 2022)


यंदा दीपिकाला फिफा वर्ल्ड कप 2022   ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलिवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे. दीपिकानं फिफा वर्ल्ड कप 2022 ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्याला दीपिकानं  ब्लॅक पँट, व्हाइट शर्ट आणि ब्राउन कलरचे लेदर कोट असा लूक केला होता. तिच्या या लूकला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. 


बेशरम रंग गाण्यातील बिकीनी
'पठाण' चित्रपटातील बेशरम रंग गाण्यामधील दीपिकाच्या बिकिनी लूकवरून वाद सुरु झाला. बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिकानं घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. 


दीपिकानं ओम शांती ओम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या पिकू, पद्मावत, रामलिला, चैन्नई एक्सप्रेस आणि 'गेहराईयां' ये जवानी है दिवानी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Singham Again : 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण दिसणार 'लेडी सिंघम'च्या भूमिकेत; दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिली माहिती