Gullak season 4 Trailer Out :

  मनोरंजनासोबत आपल्या भावनेला हात घालणारे मिश्रा कुटुंब आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गुल्लक' (Gullak Web Series) या वेब सीरिजचा आता चौथ्या सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या नव्या सीझनमध्ये अमन वयात येणार असून अन्नूवर मोठी जबाबदारी येणार आहे. मात्र, त्यासोबतीला आता मिश्रा कुटुंबात अनेक घडामोडी घडणार आहेत. 'गुल्लक 4' चा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. 


'गुलक'च्या चौथ्या सीझनचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये मिश्रा कुटुंबातील तुमच्या आवडत्या चारही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. जमील खान, गीतांजली कुलकर्णी, वैभव राज गुप्ता आणि हर्ष मेयर यांची प्रमुख भूमिका असलेला 'गुल्लक 4' च्या ट्रेलरसह, निर्मात्यांनी वेब सीरिजची तारीखही जाहीर केली. 


या सीझनमध्ये मिश्रा कुटुंबात कोणते युद्ध सुरू झाले?


या कुटुंबाचा प्रमुख संतोष मिश्रा (जमील) यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने तिसऱ्या सीझनची गोष्ट संपली होती. हृदयविकाराच्या घटनेनंतर घरातील मोठीा मुलगा आनंद मिश्रा उर्फ ​​अन्नू (वैभव) याला आपल्यावरील जबाबदारीची जाणीव होते. आता फक्त स्वत: च्या पायावर उभे राहण्याची नव्हे तर घरची देखील जबाबदारी सांभाळण्याची आवश्यकता असल्याची त्याला जाणीव होते. 


'गुल्लक 4'मध्ये ट्रेलरमध्ये मिश्राजींचा धाकटा मुलगा अमन (हर्ष) हा आता पौगंडावस्थेत प्रवेश करत आहे. कॉलेजमध्ये जाण्यास सुरुवात केलेल्या अमनने आपले  रंग बदलण्यास सुरुवात केली आहे. वयात येत असलेल्या मुलातील बदल आता त्यात दिसत आहे. दाढी येणे, घरात प्रायव्हसी मिळणे आदी तरुणाईत प्रवेश करत असलेल्या मुलांसारख्या त्याला समस्या जाणवत आहेत. 


ट्रेलरमधील एका दृश्यात अन्नू एका मुलीला भेटताना दिसत आहे आणि या दृश्यात 'मिश्रा वॉटरकुलर्स'चा उल्लेख आहे. कथेत अन्नूने वॉटर कुलरचा व्यवसाय सुरू केला असावा असे दिसते. आता अन्नू हा घरचा कमावता मुलगा असल्याने त्याला अधिक पसंती मिळणार आहे. अशा परिस्थितीत घरातील नवख्या तरुण अमनसोबत त्याचा 'कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट' होणार आहे. 


 


'गुलक 4' कधी रिलीज होणार?


सोनी लिव्हच्या या अतिशय लोकप्रिय झालेल्या वेब सीरिजचा पहिला सीझन 2019 मध्ये आला होता. पुढील दोन हंगाम 2021-22 मध्ये सलग आले. मात्र चौथ्या सीझनसाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागली. 'गुल्लक 4'चा ट्रेलर गेल्या सीझनच्या एका वर्षांहून अधिक कालावधीनंतर आला आहे. मात्र, प्रेक्षकांना आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. 'गुल्लक 4' ही वेब सीरिज 7 जूनपासून सोनी लिव्हवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


पाहा गुल्लक 4 चा ट्रेलर : Gullak 4 | Official Trailer | Jameel, Geetanjali, Vaibhav, Harsh, Sunita | 7th June | Sony LIV