Govinda Firing Case : 90 चा दशक गाजवलेला बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या अडचणीत सापडला आहे. गोविंदाकडून गोळी मिसफायर होऊन त्यालाच गोळी लागली. आता तो उपचारांसाठी रुग्णालयात दाखल आहे. या गोळीबार प्रकरणी प्रत्येक क्षणी नवीन अपडेट समोर येत आहेत.  गोविंदाच्या वक्तव्याशी मुंबई पोलीस सहमत नाहीत, अशी बातमी समोर येत आहे. पोलिस गोविंदाच्या वक्तव्यावर समाधानी नसून ते या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचं सांगितलं जातं आहे. याशिवाय चौकशीसाठी गोविंदाला समन्सही पाठवलं जाऊ शकतं.


गोविंदाच्या अडचणीत वाढ!


अभिनेता गोविंदाच्या गोळीबार प्रकरणाबाबत मंगळवारपासून सातत्याने चर्चेत आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी झालेल्या शूटिंगप्रकरणी अभिनेता गोविंदाची हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. 1 ऑक्टोबर रोजी गोविंदाच्या पायात गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवताना गोळी मिसफायर झाल्याचं त्याने सांगितलं होतं. गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती, जी शस्त्रक्रिया करून काढण्यात आली आहे. गोविंदाला सध्या उपचारांसाठी मुंबईतील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


अभिनेत्याच्या वक्तव्याशी मुंबई पोलिस सहमत नाहीत


जुहू पोलिसांनी त्याची चौकशी केली असता गोविंदाने गोळी मिसफायर झाल्याचा पुनरुच्चार केला. गोविंदाने पोलिसांना सांगितलं की, रिव्हॉल्व्हर 20 वर्ष जुनं आहे. मंगळवारी पहाटे 4.45 च्या सुमारास ही घटना घडली. गोविंदाच्या वक्तव्यावर पोलीस समाधानी नसून लवकरच त्याची पुन्हा चौकशी करणार आहेत. पोलिसांनी गोविंदाची मुलगी टीना आहुजा हिचा जबाबही नोंदवला आहे.




पोलिस चौकशीसाठी समन्स पाठवण्याची शक्यता


1 ऑक्टोबरच्या पहाटे बातमी आली होती की, गोविंदा रिव्हॉल्व्हरने गोळी मिसफायर झाल्याने जखमी झाला आणि गोळी त्याच्या पायाला लागली. त्यानंतर गोविंदावर मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शस्त्रक्रिया करुन त्याच्या पायातील गोळी काढण्यात आली. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अभिनेता गोविंदाने या प्रकरणी मुंबई पोलिसांना नोंदवलेल्या जबाबावर प्रशासन समाधानी नाही आणि त्यांना या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार आहे, त्यासाठी अभिनेत्याला चौकशीसाठी समन्स पाठवण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी लाखो रुपये घेऊनही कार्यक्रमाला गैरहजर? गंभीर आरोपांवर अभिनेत्री तृप्ती डिमरीची प्रतिक्रिया