गोलमाल अगेन! चार दिवसात 100 कोटी क्लबमध्ये
एबीपी माझा वेब टीम | 24 Oct 2017 11:19 PM (IST)
परदेशातील आणि भारतातील कमाई मिळून या सिनेमाने 100 कोटींचा आकडा रविवारीच पार केला होता.
मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजचा चौथा सिनेमा गोलमान अगेन रिलीज झाला आहे. या सिनेमाने भारतात एकूण 103.64 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 30.14 कोटी, दुसऱ्या दिवशी 28.37 कोटी, तिसऱ्या दिवशी 29.9 कोटी आणि चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी 16.4 कोटी अशी एकूण 103.64 कोटींची कमाई केली. तर परदेशात रविवारपर्यंत 20.62 कोटींचा गल्ला जमवला आहे. https://twitter.com/taran_adarsh/status/922751099022409733 परदेशातील आणि भारतातील कमाई मिळून या सिनेमाने 100 कोटींचा आकडा रविवारीच पार केला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच आहे. या वर्षात सर्वाधिक ओपनिंगचा विक्रम ‘बाहुबली 2’ च्या नावावर आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर बॉलिवूडमध्ये या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ (21.15 कोटी) आहे. अजय देवगण, तुषार कपूर, तब्बू, अरशद वारसी, जॉनी लीवर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आणि परिणीती चोप्रा यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. दरम्यान अजय देवगण आणि रोहित शेट्टी या जोडिचा सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा हा दुसरा सिनेमा आहे. ‘सिंघम रिटर्न्स’ने पहिल्याच दिवशी 32.09 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. तर ‘गोलमाल अगेन’ने 30.14 कोटींचा गल्ला जमवला.