कार्डिफ : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर 8 विकेट्सने मात करुन पाकिस्तानने फायनलमध्ये धडक मारली. पाकिस्तानचा मुकाबला आता दुसऱ्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवणाऱ्या बांगलादेश किंवा भारताशी होणार आहे.


पाकिस्तानच्या या विजयानंतर दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी पाकिस्तानला त्यांच्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. विजयाबद्दल अभिनंदन, तुम्हाला भारताच्या निळ्या रंगात पाहून चांगलं वाटलं. आता भारताकडून हरण्यासाठी तयार राहा, असं ट्वीट ऋषी कपूर यांनी केलं.

https://twitter.com/chintskap/status/875024879501717506

ऋषी कपूर यांच्या या ट्वीटनंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनीही उत्तर दिलं. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आम्हाला पाहायला आवडतो. जो चांगला खेळेल, तो जिंकेल. भारताचा विजय झाला तरीही आम्ही स्वागत करु. तुमच्याकडूनही हेच अपेक्षित आहे, असं ट्वीट एका पाकिस्तानी चाहत्याने केलं.

https://twitter.com/mfbrohi/status/875193203938349056

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात गुरुवारी दुसरा सेमीफायनल होणार आहे. या सामन्यात विजय मिळणाऱ्या संघाची गाठ रविवारी पाकिस्तानशी होईल. त्यामुळे पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळेल, अशीच चाहत्यांची इच्छा आहे.