Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटीलने (Gautami Patil) आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलं आहे. गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम म्हटलं की गडबड, गोंधळ हे प्रकार होतातच. नुकतचं बारामतीत (Baramati) गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान नृत्यांगना गौतमीने "माझ्या कुठल्याही कार्यक्रमात गोंधळ होत नाही", असं भाष्य केलं आहे. 


गौतमी पाटील काय म्हणाली? 


बारामतीतील दहीहंडी कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटील म्हणाली,"माझ्या सगळ्याच कार्यक्रमात गोंधळ होत नाही. परंतु एखाद्या कार्यक्रमात गोंधळ झाला की लोक तेच धरून बसतात. बारामती तालुक्यातील झारगडवाडीकरांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळे शुक्रवारी झालेला दहीहंडीचा माझा कार्यक्रम शांततेत पार पडला आहे. काही अपवाद वगळता माझे सर्वच कार्यक्रम शांततेच पार पडतात". 


गौतमी पुढे म्हणाली,"माझा 'घुंगरू' (Ghungroo) हा सिनेमा येत्या दोन महिन्यात प्रदर्शित होत आहे. सिनेप्रेक्षकांनी हा सिनेमा नक्की पाहावा. त्यातबरोबर आणखी एक गाणंदेखील प्रेक्षकांसाठी सरप्राईज असणार आहे". गौतमीचं 'माझा कारभार सोपा नसतोय रं' हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. आता तिच्या नव्या गाण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 






गौतमीला पाहण्यासाठी बारामतीकरांची तुफान गर्दी


बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे पार्थ पवार युथ फाऊंडेशनच्या दहीहंडी उत्सवानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तिचा हा कार्यक्रम शांततेत पार पडला आहे. पण गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहण्यासाठी बारामतीकरांनी तुफान गर्दी केली होती. मेखळी येथील भैरवनाथ दहीहंडी संघाने ही हंडी फोडली. अतिशय शिस्तबद्ध नियोजन असल्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमात कोणताही गोंधळ झाला नाही. त्यामुळेच गौतमीने आयोजकांचे नियोजन आवडल्याचे सांगितले.


गौतमीच्या 'घुंगरू'ची चाहत्यांना उत्सुकता (Gautami Patil Movie Ghungroo)


नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या 'घुंगरू' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नृत्यांगणा अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. या सिनेमात अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'लावणी क्वीन'ला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'घुंगरू' या सिनेमात प्रेक्षकांना राजकारणासह थरार-नाट्य पाहायला मिळणार आहे.


संबंधित बातम्या


Gautami Patil : महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा परिणाम सबसे कातील गौतमी पाटीलवर; 'घुंगरू'ची रिलीज डेट ढकलली पुढे