Gashmeer Mahajani : 'देऊळबंद' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) घराघरांत पोहोचला आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. गश्मीर महाजनीचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरदेखील तो चांगलाच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर तो अॅक्टिव्ह असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. गश्मीरने आता चाहत्याच्या एका ट्वीटला रिप्लाय दिला आहे.


गश्मीर महाजनीचं फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतं. अभिनेत्याच्या एका हटके लूकची सध्या चर्चा होत आहे. अभिनेत्याच्या एका चाहत्याने 
एक्स (ट्विटर) पोस्ट शेअर करत अभिनेत्याच्या या कमाल फोटोशूटला "मराठी सिनेअभिनेते सुपरस्टार गश्मीर महाजनी" असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये चाहत्याकडून गश्मीरचा उल्लेख ‘सुपरस्टार’ असा करण्यात आला आहे. त्यामुळे गश्मीरने ही पोस्ट रिशेअर करत त्याच्या सर्व चाहत्यांना खास सल्ला देत आपलं मत मांडलं आहे.


गश्मीर महाजनीचं ट्वीट काय? (Gashmeer Mahajani Tweet)


गश्मीर महाजनीने ट्वीट केलं आहे,"कृपया सुपरस्टार बोलू नका. अजून सुपरस्टार व्हायला वेळ आहे. आता मराठीत कोणीच सुपरस्टार नाही. पण एक दिवस होणार नक्की. सुपरस्टार तो असतो जो रस्त्यावरुन चालला की सर्वलोक कपडे फाडतात...नक्की होणार...माझं वचन आहे. पण आता इतकं सहज कोणाला सुपरस्टार म्हणू नका". 






गश्मीरच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव


गश्मीर महाजनीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मराठी लोक सुशिक्षित असल्याने रस्त्याने कपडे फाडतील वगैरे असं काही होणार नाही. तू आणि तुझे विचार ग्रेट, जिंकणारच तू.. संघर्ष कधी वाया जात नसतो. आमच्यासाठी तू सुपरस्टार आहेस, मराठीतील सर्वच कलाकार सुपरस्टार आहेत, मराठीत व्यावसायिक सिनेमे येणार नाहीत तोपर्यंत सुपरस्टार तयार होणार नाहीत, हृतिक रोशनही तुमच्यासमोर फिका आहे, दादा तू आमचा सुपरस्टार आहेस. ही जिद्द तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेणार हे नक्की, रवींद्र महाजनी सुपरस्टार होते, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


गश्मीरचा सिनेप्रवास (Gashmeer Mahajani Movies)


गश्मीर महाजनी हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. 'देऊळ बंद', 'कान्हा','सरसेनापती हंबीरराव' अशा सुपरहिट सिनेमांत गश्मीरनं काम केलं आहे. मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदी मनोरंजनसृष्टीतदेखील गश्मीरनं विशेष ओळख निर्माण केली आहे. 'इमली','तेरे इश्क़ में घायल' या हिंदी मालिकांमध्ये देखील गश्मीरनं काम केलं आहे. आता गश्मीरच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.


संबंधित बातम्या


Gashmeer Mahajani : गष्मीर महाजनी पुन्हा ओटीटीसाठी सज्ज, या अभिनेत्रीसोबत झळकणार नव्या वेब सिरिजमध्ये?