नवाजुद्दीनच्या आगामी 'फ्रिकी अली'चा ट्रेलर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2016 02:36 AM (IST)
मुंबई : सोहेल खानच्या आगामी ‘फ्रिकी अली’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी मुख्य भूमिकेत आहे. गोल्फवर आधारित हा सिनेमा असून, सुपरस्टार सलमान खानने ट्रेलर ट्विटरवर शेअर केला आहे. https://twitter.com/BeingSalmanKhan/status/761545999709908993 सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खान सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. याआधी 1997 साली प्रदर्शित झालेल्या ‘औजार’ सिनेमातून सोहेलने दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली होती. ‘औजार’ सिनेमात सलमान खान आणि संजय कपूर यांनी अभिनय केला होता. त्यानंतर सोहेलने सलमान आणि अरबाज खान यांच्या प्रमुख भूमिका असलेले ‘प्यार किया तो डरना क्या’ आणि ‘हॅलो ब्रदर’ यांसारख्या सिनेमांचंही दिग्दर्शन केलं होतं. 2014 साली ‘जय हो’ सिनेमाचंही दिग्दर्शन सोहेल खाननेच केलं होतं. फ्रिकी अली सिनेमा 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. आपल्या हटके आणि अभ्यासू भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेल्या नवाजुद्दीनच्या या आगामी सिनेमाची चाहत्यांनाही उत्सुकता आहे. पाहा ट्रेलर :