कोलकाता: केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील सर्व कागदपत्रे सार्वजानिक केल्यानंतरही, नेताजींचे  विमान अपघातानंतर गायब होण्यामागचे रहस्य अद्याप कायम आहे. पण आता एक बंगाली चित्रपट या रहस्यावरील पडदा लवकरच उघडणार आहे. हा चित्रपट फैजाबादमधील गुमनामी बाबाच्या जीवनावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.

 

नेताजींच्या जीवनावर आधारित चित्रपटांमधून 18 ऑगस्ट 1945 रोजी ताइहोकू विमान अपघातानंतरचे रहस्य आजही कायम आहे. या अपघातात नेताजींचे निधन झाल्याचा अनेकांचा समज आहे.

 

'संन्यासी देशोनायक: क्वेस्ट फॉर ट्रुथ अॅन्ड जस्टिस' हा चित्रपट फैजाबादमधील गुमनामी बाबांच्या रुपातील नेताजींचे पुनर्गामनवर प्रकाश टाकणारा असल्याचे चित्रपट दिग्दर्शक अलमान कुसुम घोष यांनी सांगितले.

 

दरम्यान, नेताजींच्या गायब होण्यावर चित्रपटात कोणतेही भाष्य करण्यात आले नसल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

 

मात्र, दिग्दर्शक घोष म्हणाले की, ''गुमनामी बाबा ही एक शक्यता आहे. हा चित्रपट बायोपिक नसून, डॉक्यू फिक्शन आहे. आपण कोणत्याही शक्यतांना नाकारू शकत नाही. गुमनामी बाबा बांगालीसोबत ऊर्दू, रशियन, हिंदी आणि इंग्रजी आदी भाष्या बोलत होते. विशेष म्हणजे त्यांच्या अनुयायांची संख्याही मोठी होती.''

 

घोष पुढे म्हणाले की, ''यासंबंधीचे माझे अध्ययन सुरु असून, आतापर्यंत  1945 पर्यंतच्या भागाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. श्याम बेनेगल यांच्यासारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांनी नेताजींच्या विमान अपघातानंतरच्या जीवनाचा उल्लेख का केला नाही याचे मला अश्चर्य वाटते.''

 

या व्यक्तीमत्त्वाचा आपण खोलात जाऊन शोध घेतल्याचे घोष यांनी सांगितले. त्यांनी नेताजींच्या विमान अपघातानंतरचा मुखर्जी आयोगासोबतच इतरही आयोगाचे अहवाल तपासले आहेत. यात 17 मे 2006 साली संसदेत सादर केलेल्या अहवालाचाही समावेश आहे.

 

या चित्रपटात विक्टर बॅनर्जी गुमनामी बाबाच्या रुपात दिसणार आहे. शाश्वत चॅटर्जी आझाद हिंद सेनेचे दिग्गज दाखवण्यात आले आहेत.