Suneel Darshan: ज्येष्ठ निर्माते- दिग्दर्शक सुनील दर्शन (Suneel Darshan) यांनी नुकतेच अभिनेता सनी देओलवर (Sunny Deol) गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या सुनील दर्शन हे चर्चेत आहेत. एका मुलाखतीमध्ये सनी देओलवर सुनील यांनी गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी सांगितलं की, सनीनं त्यांची फसवणूक केली. सनीला खूप अहंकार होता, असंही सुनील यांनी या वेळी सांगितलं. 


काय म्हणाले सुनील दर्शन? 
एका मुलाखतीमध्ये सुनील दर्शन यांनी सांगितलं की, सनी देओलला खूप अहंकार होता. 26 वर्षांनंतरही त्याच्याविरुद्धचा खटला सुरू आहे. त्याने मला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. पण तो नंतर म्हणाला की त्याच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे मी त्याच्यासोबत चित्रपट बनवावा, असंही त्यानं मला सांगितलं. हे प्रकरण निवृत्त सरन्यायाधीश भरुचा यांच्यासमोर ठेवण्यात आले होते.


'सनीनं मला सांगितलं होतं की, त्याच्याकडे माझे पैसे परत करण्यासाठी रोख रक्कम नव्हती. त्यामुळे तो माझ्या चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाला होता. त्यानंतर मी त्याच्याबरोबर बॅक टू बॅक तीन चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यानं मला वेड्यात काढले होते. ' असंही दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सांगितलं. 


अजय चित्रपटाच्या सेटवर झाले होते मतभेद
1996 मध्ये रिलीज झालेल्या अजय या चित्रपटाच्या सेटवर सुनील आणि सनी यांच्या मतभेद झाले होते. सुनील दर्शनने पुढे मुलाखतीमध्ये सांगितले की, 'सनी देओलने करारात दिलेली मुदत संपेपर्यंत चित्रपट पुढे ढकलला होता. त्यानंतर माझ्या कायदेशीर टीमने सनीला नोटीस पाठवली. पण सनी देओलच्या टीमने या चित्रपटातील संवाद त्याला मान्य नसल्याचे उत्तर दिले.' 


‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटामुळे सनीला विशेष लोकप्रियता मिळाली. सनी देओलच्या काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये बॉर्डर, गदर, अर्जुन, सल्तनत, डकैत, त्रिदेव, चालबाज, विष्णू देवा, अपने, यमला पगला दिवाना यांचा समावेश आहे. सनी देओलचा गदर-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सकिना ही भूमिका अमिषा पटेल तर तारा सिंग ही भूमिका सनी देओल साकारणार आहेत. सनीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Happy Birthday Sunny Deol : पहिल्या चित्रपटाआधीच सनी देओलने गुपचूप उरकले होते लग्न, अभिनेत्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?