न्यूयॉर्क: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि सिने दिग्दर्शिका फराह खान एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. ती आपल्या तिन्ही मुलांसोबत अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली आहे.


 

रविवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक स्फोट झाला. त्यावेळी फराह तिच्या मुलांसह त्याच परिसरात होती. तिनं ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. 'जेव्हा सेंट्रल पार्कमध्ये स्फोट झाला त्यावेळी आम्ही तिथेच उपस्थित होतो. आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही.' असं ट्विट तिने केलं आहे.

 


 

या स्फोटात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतंर पार्क अशंत: बंद करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहे.

 
दरम्यान, या स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण असं म्हटलं जात आहे की, सोमवारी असणाऱ्या स्वातंत्र्यदिनापूर्वी करण्यात आलेल्या आतिषबाजीतून हा स्फोट झालेला असावा.