Akshay Kelkar Bigg Boss Marathi Winner : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या प्रर्वाचा (Bigg Boss Marathi 4) अक्षय केळकर (Akshay Kelkar) विजेता ठरला आहे. एका रिक्षा चालकाचा मुलगा ते बिग बॉसचा विजेता हा प्रवास नक्की कसा घडला जाणून घ्या.. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय (Bigg Boss Marathi Winner) म्हणाला,"एक घर, 19 स्पर्धक आणि दिवसांचा प्रवास खूप खडतर होता. क्षणोक्षणी अपमान होत असल्याने हा प्रवास सोपा नव्हता. प्रत्येक वाटेवर हा प्रवास खडतर होता. 'बिग बॉस'मध्ये सतत ट्वीस्ट येत होते. त्यामुळे हा प्रवास खडतर होत चालला होता. पण खडतर वाटेवरचं सुख मिळतं". 


'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यावर अक्षयने काय केलं? 


अक्षय म्हणाला,"बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यावर सगळ्यात आधी मी ट्रॉफी हातात घेऊन फोन हातात घेतला. शंभर दिवसांनी घेतल्यानंतर हात थरथरत होता. पण तसंच मी रमा आणि आईला फोन केला. त्यांना आनंदाची बातमी दिली". 


अक्षयच्या करिअरचा टॉप गिअर कधी पडला?


एका मराठी मालिकेसाठी अक्षयची विचारणा झाली होती. पण काही कारणाने त्याला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यावर भाष्य करताना अक्षय म्हणाला,"मराठी मालिकांमध्ये स्ट्रगल सुरू होता. पण चांगलं काम मिळत नव्हतं. दरम्यान दोन हिंदी मालिकांमध्ये ब्रेक मिळाला. आज मी 'बिग बॉस'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलो आहे. तसेच प्रेक्षकांचं मन जिंकून ट्रॉफीला घरी आणलं आहे". 


अक्षयचं मीटर पडल्यावर बाबा आनंदी


अक्षयच्या यशाबद्दल बाबा म्हणाले,"अक्षय जिंकल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. माझ्यापेक्षा माझ्या मित्रांना जास्त आनंद झाला आहे. आता त्याची अशीच प्रगती होत राहणार आहे. अक्षयला 'बिग बॉस'मध्ये मी पाठवलं होतं. त्यामुळे तोच जिंकणार याची मला खात्री होती". 


अक्षयने केली अडचणींच्या स्पीडब्रेकरवर मात


अक्षय म्हणाला,"एखाद्या गोष्टीत खचल्यानंतर पुढे चालत राहणं गरजेचं असतं. एखाद्या गोष्टीवर माझा विश्वास आहे. तसेच ठरवलेली गोष्ट मी पूर्ण करतो. आयुष्यात स्पीडब्रेकर अनेक येत असतात. आपण फक्त चालत राहायचं असतं. स्वत:ला शाबासकी देत राहण्याची गरज असते". 


अक्षय मिळालेल्या लाखो रुपयांचं काय करणार? 


अक्षय म्हणाला,"एवढे पैसे माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या घरात पहिल्यांदाच आले आहेत. ही खरचं खूप मोठी रक्कम आहे. प्रत्येक सामान्य माणसाचं स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न असतं. माझंदेखील हेच स्वप्न आहे. आता ते साकार करण्याचा मी प्रयत्न करणार आहे". 


एबीपी माझाने अक्षयला काही रॅपिड फायर प्रश्न विचारले. या प्रश्नांची अक्षयने खूप हुशारीने उत्तर दिली. 


पुढील सिनेमा हिंदी की मराठी करायला आवडेल - एकाचवेळी दोन्ही


मामलेदारची मिसळ की कुंजविहारचा वडापाव - कुंजविहारचा वडापाव


मुंबईकर होणार की ठाणेकरचं राहणार - मुंबईकर


आई की रमा - रमाई



संबंधित बातम्या


Akshay kelkar : दारं-खिडक्या बंद करुन 'बिग बॉस' बघायचा अक्षय केळकर; खास मित्र म्हणतोय...