Samantha On Bonding With Naga Chaitanya : अभिनेत्री समंथा (Samantha ) रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य अक्किनेनी  ( Samantha,Naga Chaitanya)‘ये माया चेसावे’ यांची तेलगू चित्रपटाच्या शूटिंग भेट झाली. त्यानंतर  ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. 6 ऑक्टोबर  2017 रोजी समंथा आणि नागा चैतन्य लग्नबंधनात अडकले होते.  परंतु, या दोघांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. 


चार वर्षांचा संसार मोडून समंथा आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी घटस्फोट घेण्याचे कारण खासगी ठेवले होते. परंतु, दोघांच्या नात्याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जाऊ लागले होते. दरम्यान, दोघांशी संबंधित जुने किस्सेही प्रचंड व्हायरल झाले आहेत. यापैकी एक म्हणजे नागा चैतन्यसाठी समंथाने केलेली प्रशंसा.


समंथा आणि नागा चैतन्य आज वेगळे झाले असले तरी एक काळ असा होता, जेव्हा दोघांमध्ये खूप प्रेम आणि समजूतदारपणा होता. समंथाने स्वतः चैतन्यचे कौतुक करताना सांगितले होते की, नागा खूप बुद्धिमान आहे. ते दोघेही घरात चित्रपटाबाबत चर्चा करत नाहीत. कामावरून परतल्यावर आपण फक्त घर आणि विश्रांतीबद्दल बोलतो. चैतन्य एक अभिनेता असल्याने त्याला समजते की चुंबन घेणे हा माझ्या कामाचा एक भाग आहे. 


 'रंगस्थलम' चित्रपटात समंथाला राम चरणसोबत किसिंग सीन द्यावा लागला. त्यावर समंथाने चैतन्यचे कौतुक केले होते. परंतु, तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, हा किसिंग सीन नसून व्हीएफएक्सची जादू होती. सीनमध्ये फक्त गालाला स्पर्श करण्यात आला होता, तो लिप लॉक नव्हता. मात्र, पडद्यावर प्रेक्षकांच्या मनात हेच राहिलं की सामंथानं खरंच हे केलं होतं. त्यामुळे त्यावेळी तिला खूप ट्रोलही करण्यात आलं होतं.


महत्वाच्या बातम्या