आलीशान बंगला, महागड्या गाड्यांचं कलेक्शन, संपत्तीच्या बाबतीत दिग्गज स्टार्सना देतो टक्कर, एल्विश यादवची नेटवर्थ किती?
Elvish Yadav Net Worth : यूट्यूबच्या माध्यमातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा एल्विश यादव आता एखाद्या स्टारप्रमाणे आयुष्य जगतोय.

Elvish Yadav Net Worth : बिग बॉस ओटीटी-2चा विजेता आणि अनेकदा वादांमध्ये अडकलेला यूट्यूबर एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण, त्यांच्या गुरुग्राम येथील घरावर काही अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केलाय. बाइकवरून आलेल्या गुंडांनी गोळ्या झाडल्या आणि लगेचच पळ काढला. सुदैवाने, त्या वेळी एल्विश यादव घरी उपस्थित नव्हता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, आता पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सोशल मीडिया स्टार एल्विश यादवने नुकताच करण कुंद्रासोबत लाफ्टर शेफ्स या शोच्या दुसऱ्या सीझनचा किताब जिंकला आहे. एल्विशच्या कारकिर्दीत यश तर आहेच, पण त्याचबरोबर वादही कायम जोडले गेले आहेत. मात्र इथे आपण त्याच्या कमाई आणि संपत्तीबद्दल जाणून घेऊ, ज्यात तो अनेक बॉलिवूड स्टार्सना टक्कर देतो.
एल्विश यादवची नेटवर्थ किती आहे?
तरुण वयातच सोशल मीडिया आणि यूट्यूबच्या माध्यमातून एल्विश यादवने लाखो चाहत्यांना जोडले आणि मोठ्या प्रमाणावर कमाईही केली. त्याचे आलिशान घर, महागड्या गाड्या आणि खर्चिक जीवनशैली नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेते. बिग बॉस ओटीटी-2 जिंकल्यानंतर त्याची ओळख सेलिब्रिटींमध्ये होऊ लागली.
नेटवर्थबाबत एल्विशने दिलेली प्रतिक्रिया
रिपोर्ट्सनुसार, एल्विश यादवकडे जवळपास 50 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पण टाइम्स नाऊशी बोलताना एल्विशने सांगितले होते की, "ही खूप मोठी रक्कम आहे. लोकांना हा आकडा कुठून कळतो, हे मलाच माहीत नाही."
ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई
एल्विश यादव सोशल मीडियावरून पैसे कमावतोच, पण यूट्यूब व इंस्टाग्रामशिवाय ब्रँड एंडोर्समेंटमधूनही तो मोठी कमाई करतो. लाफ्टर शेफ्स या शोदरम्यान प्रत्येक एपिसोडसाठी त्याने सुमारे दोन लाख रुपये फी घेतली होती. याशिवाय त्याचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे, ज्यातून त्याला चांगली कमाई होते.
महागड्या गाड्यांचा नाद
एल्विश अनेक रिअॅलिटी शोचा भाग राहिला असून त्यातूनही त्याने बरीच कमाई केली आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या व आलिशान गाड्या आहेत. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ जी-वैगन इलेक्ट्रिक आहे, ज्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे फॉर्च्युनरसह इतर काही गाड्याही आहेत.
गुरुग्राममधील 16BHK आलिशान घर
घराच्या बाबतीत बोलायचं झालं तर एल्विश यादवने गुरुग्राममध्ये 16 बेडरूम्स असलेलं आलिशान घर बांधलं आहे. हे घर गुरुग्राममधील अत्यंत पॉश भागात असून, सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे.
'अलका कुबल विमानतळावर भेटल्या अन् म्हणाल्या तुला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर..', गौतमी पाटीलने सांगितला किस्सा





















