प्रेक्षकांनी गौरवलेल्या 'जंगल बुक'चा सिक्वेल येणार
एबीपी माझा वेब टीम | 26 Apr 2016 08:42 AM (IST)
लॉस अँजेलस : फक्त भारतातीलच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांनी गौरवलेल्या 'द जंगल बुक' चित्रपटाचा लवकरच सिक्वेल येणार आहे. 'द जंगल बुक', 'मॅलेफिशंट' या चित्रपटांच्या सिक्वेल काढण्यावर डिस्ने स्टुडिओने शिक्कामोर्तब केलं आहे. डिस्नेच्या बॅनरअंतर्गत बनलेला हा 1967 मध्ये आलेल्या सिनेमाचं अॅनिमेटड व्हर्जन आहे. मुंबईत जन्मलेल्या रुडगार्ड किप्लिंग यांच्या पुस्तकावर आधारित 'जंगल बुक' हे कार्टून जगभरात गाजलं होतं. प्रदर्शित झाल्यानंतर केवळ दहा दिवसात सिनेमाने 100 कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे. 'द जंगल बुक' पहिल्यांदा भारतात रिलीज झाला. 8 एप्रिलला भारतात प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट आठवडाभराने अमेरिकेत रिलीज झाला.