Disha Patani Bareilly house Shots fired : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घराबाहेर गुरुवारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घरात सध्या दिशा पाटनीचे वडील, निवृत्त डिप्टी एसपी जगदीश पाटनी राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेचार वाजताच्या सुमारास दोन अज्ञात इसम मोटरसायकलवरून आले आणि सिव्हिल लाईन्स परिसरातील घराच्या मुख्य दरवाजावर तसेच भिंतीवर चार-पाच फायरिंग केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर तातडीने पोलिस फोर्स घराबाहेर तैनात करण्यात आला असून एसपी सिटी व एसपी क्राईम यांच्या नेतृत्वाखाली पाच विशेष पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. (Disha Patani Home Attacked in Bareilly Gunmen Open fired gangster)

सलमान खानला धमकवणाऱ्या गँगने घेतली जबाबदारी 

दरम्यान, गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी हिने प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा बदला घेतल्याचा दावा केला. तसेच संत आणि धर्मांविरोधात बोलणाऱ्यांना परिणाम भोगावा लागेल, अशी उघड धमकीही दिली. पण, ही पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली आहे. गोल्डी ब्रार हा तोच आहे ज्याने सलमान खानला धमकी दिली आहे. (Goldy Brar takes responsibility)

गँगस्टर रोहित गोदारा–गोल्डी ब्रारची पोस्ट; फायरिंगमागचं कारण स्पष्ट

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घराबाहेर झालेल्या फायरिंगनंतर गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगने फेसबुकवर पोस्ट टाकत या हल्ल्याची जबाबदारी घेतली. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "भाऊंनो, आज खुशबू पाटनी/दिशा पाटनीच्या घराबाहेर जी फायरिंग झाली आहे, ती आमची कारवाई आहे. याने आमचे पूज्य संत प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्यजी महाराज यांचा अपमान केला आहे. आमच्या सनातन धर्माला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या देवी-देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा तर फक्त एक ट्रेलर होता. पुढच्या वेळी जर याने किंवा इतर कुणी आमच्या धर्माविरुद्ध काहीही उघडपणे बोलले तर त्यांच्या घरात कुणालाही जिवंत सोडणार नाही."

नेमकं काय आहे खुशबू पाटनीचं प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनीने (Disha Patani sister Khushboo Patani) एक व्हिडिओ बनवला होता. त्यावरून दावा करण्यात आला की तिने प्रेमानंदजी महाराज यांच्याविरोधात वक्तव्य केले आहे. मात्र, खुशबूने लगेचच स्पष्टीकरण देत सांगितले की, तिचा व्हिडिओ प्रेमानंदजींसाठी नसून अनिरुद्धाचार्य यांच्यासाठी होता.

खरं तर अनिरुद्धाचार्य यांनी लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्याच्यामुळे खुशबू संतप्त झाली आणि अनिरुद्धाचार्य यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती.

हे ही वाचा -

सलमान खानसोबत स्टेजवर थिरकणारी अभिनेत्री आता झालीये 61 वर्षांची, चेहऱ्यावर सुरकुत्या; ओळखणेही कठिण!