Diljit Dosanjh Jaipur Concert Theft : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याचे देशविदेशात लाखो चाहते आहेत. दिलजीतच्या कॉन्सर्टची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच जयपूरमध्ये त्याचा कॉन्सर्ट मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कॉन्सर्टला आलेल्या चाहत्यांना मात्र मोठा फटका बसला. दिलजीतच्या कॉन्सर्टच्या गर्दीत चोरांनी चांगलाच हात साफ करुन घेतला. कॉन्सर्टनंतर अनेक चाहत्यांचे फोन चोरीला गेल्याची धक्कादायक भटना समोर आली. कॉन्सर्ट संपल्यानंतर एकच गोंधळ उडाला, यावेळी चोरांनी संधी साधत गर्दीतील लोकांचे फोन चोरले. कॉन्सर्टनंतर 100 हून अधिक जणांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याची माहिती आहे. याप्रकरणी अनेकांनी एफआयआरही दाखल केले आहेत.
दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट संपताच उडाला गोंधळ
जयपूरमध्ये रविवारी दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्ट पार पडलं. या कॉन्सर्टमध्ये चोरीची मोठी घटना समोर आली आहे. कॉन्सर्ट दरम्यान 32 हून अधिक दर्शकांचे मोबाईल चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर तेथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कॉन्सर्ट संपल्यानंतर अनेक पीडितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दिलजीतकडे मदतीची विनंतीही केली आहे.
कॉन्सर्टमध्ये शेकडो मोबाईल चोरीला
रविवारी जयपूरमध्ये दिलजीच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी 32 जणांनी मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. कार्यक्रमात चोरीच्या घटना घडल्यानंतर आता एकाच दिवसात सांगानेर पोलीस ठाण्यात 32 मोबाईल चोरीच्या एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉन्सर्टगदरम्यान 100 हून अधिक फोन चोरीला गेले आहेत, पण त्यापैकी केवळ 32 गुन्हे नोंदवलं गेले आहेत, असं सांगितलं जात आहे.
गर्दीत संधी साधत चोरट्यांचा डल्ला
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टचा बंदोबस्त, पोलीस आणि बाऊन्सर्सच्या कडेकोट बंदोबस्ताचा बोजवारा उडाला आहे. शो संपल्यावर अनेक प्रेक्षकांना त्यांचे फोन चोरीला गेल्याचं समजलं, त्यानंतर मोबाईल चोरीवरून प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. शोमध्ये ज्या लोकांचे फोन चोरीला गेले होते, त्यांनी पोलिस तक्रार दाखल केली आहे. या सोबतच चाहत्यांनी त्यांचे चोरीचे मोबाईल परत मिळवण्यासाठी दिलजीत दोसांझकडे मदत मागितली आहे.
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये सुरक्षेचा बोजवारा
महत्त्वाच्या इतर बातम्या :