Dharmendra Taj Royal Blood Series: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. धर्मेंद हे विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. आता त्यांची नवी वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर (OTT) रिलीज होणार आहे. या सीरिजचं नाव 'ताज रॉयल ब्लड' (Taj Royal Blood) असं आहे. या सीरिजमध्ये धर्मेंद्र हे सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत. धर्मेंद्र यांनी त्यांच्या या सीरिजमधील लूकचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
धर्मेंद्र यांनी बुधवारी (14 फेब्रुवारी) सोशल मीडियावर त्यांचा 'ताज रॉयल ब्लड' या सीरिजमधील लूकचा फोटो शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'मित्रांनो, मी शेख सलीम चिश्ती या सुफी संतांची भूमिका साकारणार आहे. ही छोटी पण महत्वाची भूमिका आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे.'
या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'ताज रॉयल ब्लड'
धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या 'ताज रॉयल ब्लड' (Taj Royal Blood) या वेब सीरिजमध्ये अभिनेते नसिरुद्दीन शाह हे देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. आशिम गुलाटी, अदिती राव हैदरी, राहुल बोस हे कलाकार या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत. ते या चित्रपटात अकबर ही भूमिका साकारणार आहे. 'ताज रॉयल ब्लड' ही वेब सीरिज झी-5 या ओटीटी प्लॅफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
धर्मेंद्र यांचे चित्रपट
मेरा गाव मेरा देश, प्रतिज्ञा, शोले, धरम-वीर शालीमार, लाइफ इन अ मेट्रो यांसारख्या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र यांनी काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. धर्मेंद्र यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात धर्मेंद्र यांच्यासोबतच शबाना आझमी, रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि जया बच्चन हे कलाकार काम करणार आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :
Shehzada Title Track Releases: 'मैं जो आ गया...'; कार्तिक आणि क्रितीच्या 'शहजादा'मधील गाणं रिलीज