Devendra Fadnavis On Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानला (Salman Khan) धमक्या मिळणं अजूनही थांबलेलं नाही. त्याला काही दिवसांपूर्वी धमकीचा मेल आला होता. त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली. त्यानंतर एका मुलाखतीत सलमान म्हणाला होता की,"दुबई सरक्षित आहे". आता सलमानच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,"सलमानला भारतात पूर्ण सुरक्षा देण्यात आली आहे".
धमकीप्रकरणानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. या धमक्यांमुळे दबंग खानने दुबई सुरक्षित आहे. पण सुरक्षेची समस्या भारतात येते, असं वक्तव्य एका मुलाखतीत केलं होतं. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,"सलमान खानला मुंबईत किंवा भारतात कुठेही अडचण येणार नाही. त्याला पूर्ण सुरक्षा देण्यात आली आहे".
सलमान खान काय म्हणाला होता?
सलमान खान म्हणालेला,"मला धमक्यांची भीती वाटत नाही. वाय प्लस सुरक्षेमुळे मी सुरक्षित आहे. दुबई खूप सुरक्षित आहे. पण भारतात सुरक्षेची समस्या येते. मला सांगितेल्या नियमाचं पालन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. प्रत्येक पाऊल सावधानतेनं टाकावं लागत आहे".
सलमान खान धमक्यांना घाबरणारा नाही
लॉरेन्स बिश्नोई धमकीप्रकरणानंतर सलमानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. याआधी धमक्यांबद्दल सलमान खान म्हणाला होता,"धमक्यांकडे जास्त लक्ष दिलं तर त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीकडे जास्त लक्ष देत आहोत असं होईल, हे अत्यंच चुकीचं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला मी काही म्हणालो तर त्याच्या प्लॅनमध्ये तो अधिक यशस्वी होईल. मी धमक्यांना घाबरणारा नाही. जेव्हा जे व्हायचं तेव्हा ते होईल".
सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. यशराजच्या आगामी 'टायगर वर्सेस पठाण' या सिनेमात अभिनेता झळकणार आहे. तसेच त्याला 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो कतरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
संबंधित बातम्या