मुंबई : बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) लवकरच आई होणार आहे. दीपिका तिच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. दीपिका प्रेग्नेंट असून सध्या हा काळ इन्जॉय करत आहे. सप्टेंबर महिन्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. दीपिका अलिकडेच कल्कि 2898 एडी (Kalki 2898 AD) चित्रपटात झळकली होती. कल्कि चित्रपटाच्या शूटिंग वेळी दीपिका प्रेग्नेंट होती. सध्या दीपिका फिल्म इंडस्ट्रीच्या शेड्युलपासून दूर असून तिची आणि बाळाच्या तब्येतीची काळजी घेत आहे.


'मॉम टू बी' दीपिकानं नाकारली मोठी इंटरनॅशनल ऑफर


अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या होणाऱ्या बाळाची काळजी घेत निवांत वेळ घालवत आहे. अशात प्रेग्नेंसीनंतर दीपिका मोठ्या पडद्यावर पुनरागमन केव्हा करणार, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. काही चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे की, दीपिका इतर अभिनेत्रींप्रमाणे प्रेग्नेंसीनंतर लगेचच पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे. पण, याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.


द व्हाईट लोटस या इंटरनॅशनल वेब सीरिजची ऑफर नाकारली


दीपिका पादुकोण प्रेग्नेंसीनंतर लगेचच काम करण्याच्या विचारात नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकानं होणाऱ्या बाळासाठी एक मोठी इंटरनॅशनल ऑफर नाकारली आहे. दीपिकाने एक मोठी आंतरराष्ट्रीय ऑफर तर नाकारलीच पण आपल्या बाळाची काळजी ती स्वतःच घेण्याचं ठरवलं आहे. दीपिका पादुकोणनं द व्हाईट लोटस या इंटरनॅशनल वेब सीरिजची ऑफर नाकारली आहे. प्रेग्नेंसीनंतर दीपिका लगेचच कामावर परतणार नाही, तर बाळाची संगोपन करणार आहे.






सध्या कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन करणार नाही


अभिनेत्री दीपिका पादुकोण आई होण्यासाठी खूप उत्सुक आहे. तिला मुलं खूप आवडतात आणि हे तिच्या चाहत्यांना हे चांगलंच माहीत आहे. प्रसूतीनंतर दीपिकाला मातृत्वाच्या प्रवासाचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे ती कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन करणार नाही. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, दीपिकाने 'द व्हाईट लोटस'च्या तिसऱ्या सीझनची ऑफर नाकारली आहे, कारण तिला तिचा वेळ तिच्या मुलाच्या संगोपनासाठी द्यायचा आहे. 


चिमुकल्याचं संगोपनही नॅनीनाही तर स्वत: करणार


सेलिब्रिटी मुलांच्या संगोपनासाठी नॅनी म्हणजेच आया ठेवतात, पण दीपिका तिच्या बाळासाठी कोणतीही आया ठेवणार नाही, असं सूत्रांच्या हवाल्याने समोर आलं आहे. दीपिकाचा साईड प्लान नेहमीच आई बनण्याचा होता. याआधी राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत दीपिकानं सांगितलं होतं की, ती अभिनेत्री नसती तर, सेटल झाली असती. स्वतःचे कुटुंब असावं आणि तीन मुलांची इच्छा तिने व्यक्त केली होती.