Compass Web Series: ओटीटीवरील वेब सीरिज आणि चित्रपट बघायला अनेकांना आवडते. वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. गेल्या वर्षी 'प्लॅनेट मराठी' या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रेक्षकांना विविध वेब सीरिज बघायला मिळतात. दर्जेदार, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, लघुपट, सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेबसीरिज असा मनोरंजनाचा सर्वोत्कृष्ट खजिना दिल्यानंतर आता नवीन वर्षात नवीन कॉन्टेन्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास प्लॅनेट मराठी सज्ज झाले आहे. वर्षाची सुरुवात प्लॅनेट मराठी सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'कंपास' (Compass) या वेबसीरिजने करणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा मुहूर्त सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी उर्मिला कानेटकर - कोठारे, सायली संजीव, ऋतुजा बागवे, पौर्णिमा डे, खुशबू तावडे, सुयश टिळक, संग्राम साळवी, सौरभ गोखले, धवल पोकळे, राजेंद्र शिसतकर, गिरीश जोशी, आनंद इंगळे, संजय मोने यांच्यासह निर्माते अक्षय बर्दापूरकर आणि संतोष रत्नाकर गुजराथी उपस्थित होते.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "मागील वर्ष आमच्यासाठी खूप खास होते. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक कॉन्टेन्ट आणले आणि विशेष म्हणजे ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता नवीन वर्षाची सुरुवात आम्ही 'कंपास' या वेबसीरिजच्या चित्रीकरणापासून करत आहोत. येत्या काळात आम्ही अनेक काल्पनिक, अकल्पनिय चित्रपट, वेबसीरिज, लघुकथा घेऊन भेटीला येऊ. 'कंपास' हा खूप वेगळा विषय असून यात कसलेल्या कलाकारांची दमदार फळी आहे. 'कंपास' हे नावाच खूप अपिलिंग असून यात प्रेक्षकांना काहीतरी जबरदस्त क्राईम थ्रिलर पाहायला मिळणार आहे.''
दिग्दर्शक सुश्रुत भागवत म्हणतात, " नवीन वर्षात प्लॅनेट मराठी सोबत नव्यानं पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळणे, ही खूपच आनंदाची बाब आहे. 'कंपास' ही एक क्राईम थ्रिलर आहे, यापेक्षा अधिक मी काहीही सांगणार नाही, हां एवढं मात्र नक्की की अशी वेबसीरीज या आधी मराठीत तुम्ही पाहिली नसेल.''
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: