Chup Box Office Collection : दुलकर सलमान (Dulquer Salmaan) आणि सनी देओलचा (Sunny Deol) 'चुप: रिवेंद ऑफ द आर्टिस्ट' (Chup: Revenge of the Artist) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र'नंतर 'चुप' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. 


'चुप: रिवेंद ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आर बाल्कीने सांभाळली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 2.60 ते 3.20 कोटींची कमाई केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सिनेमाने रिलीजआधीच रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 'चुप: रिवेंद ऑफ द आर्टिस्ट' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे.






'चुप: रिवेंद ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमाचे रिलीजआधीच 63,000 तिकीट विकले गेले होते. तर रिलीजच्या दिवशी या सिनेमाचे चार लाख तिकीट विकले गेले आहेत. 'चुप' या सिनेमात प्रेक्षकांना थरार, नाट्य अनुभवायला मिळणार आहे. सनी देओल, दुलकर सलमान व्यतिरिक्त या सिनेमात पूजा भट्ट, आणि श्रेया धनवंतरीदेखील मुख्य भूमिकेत आहेत. 


'चुप: रिवेंद ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राकेश झुनझुनवाला, जयंतीलाल गडा, अनिल नायडू आणि गौरी शिंदेने सांभाळली आहे. तर या बहुचर्चित सिनेमाचा अभिताभ बच्चनदेखील भाग आहेत. पण या सिनेमात अमिताभ बच्चन अभिनेते म्हणून नव्हे तर  ‘संगीत संयोजक’ म्हणून झळकत आहेत. 


संबंधित बातम्या


Chup : अंगावर शहारे आणणारा 'चुप' सिनेमाचा ट्रेलर आऊट; सनी देओल मुख्य भूमिकेत


Chup Teaser : सनी देओलचा 'चुप' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; अमिताभ बच्चनने शेअर केला टीझर