Urfi Javed : उर्फी जावेदने (Urfi Javed) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना पुन्हा एकदा जाणीवपूर्वक डिवचलं आहे. उर्फीने ट्वीटरवर फोटो शेअर करत 'अभी भी बहुत सुधार बाकी है, सॉरी चित्रा वाघ, आय लव्ह यू" असं म्हटलं आहे. तर त्याआधीच्या ट्वीटवरून चित्रा वाघ यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे.  
"मेरी डीपी ढासू, चित्रा मेरी सासू", असं ट्वीट उर्फीने केलं आहे. चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषद घेत उर्फीच्या चित्रविचित्र कपड्यांवर आक्षेप घेत आहेत. आता मुंबई पोलीस उर्फीवर कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. 


चित्रा वाघ म्हणाल्या, उर्फी जावेदच्या प्रकृतीला माझा विरोध आहे. कोणी काय घालावं आणि कोणी काय घालू नये हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही. उर्फी रस्त्यावर विकृत कपड्यात फिरुन मुलांना उत्तेजित करत आहे. मी उर्फीच्या विरोधात नाही, तिच्या विकृतपणे वावरण्याला माझा आक्षेप आहे". 






चित्रा वाघ पुढे म्हणाल्या,"सावित्रीबाईंमुळे महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. त्यांना तरी हा नंगा नाच पटेल का? प्रसिद्धीसाठी काहीही करण्याची गरज नाही. नंगानाच आणि विकृतीचं समर्थन करणाऱ्यांना सद्बुद्धी देवो असं मी आजच भवानी मातेला साकडं घातलं आहे. तसेच विकृतीच्या विरोधात लढायला बळ दे, असं मागणंदेखील मागितलं आहे. 


चित्रा वाघ यांनी याआधीदेखील उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, 'व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांना लाज वाटत नाही? व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार माजवला आहे. चार भिंतींच्या आत तुम्ही उघडे-नागडे नाचा, आम्हाला त्याचं काही वाटणार नाही पण ज्यावेळी सार्वजनिक ठिकणी अशा पद्धतीनं कोणी वागले तर तुम्हाला त्याचा प्रसाद मिळेल. मी पुन्हा एकदा सांगितले, पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मी केली आहे. ज्या दिवशी मला ती सापडेल. तेव्हा पहिल्यांदा तिचं थोबाड रंगवेन आणि नंतर मी तुम्हाला ट्वीट करुन सांगेल की, मी काय केलं. हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही.' 


संबंधित बातम्या


Amruta Fadnavis On Urfi Javed : "तिला सांगा"; उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया