Marathi Natak : गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार नाटकं (Marathi Natak) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रंगकर्मींनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. तर प्रेक्षकदेखील आता नाटकांना पसंती देताना दिसत आहेत. या वीकेंडलादेखील नाट्यरसिकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 'चारचौघी', 'दादा एक गुड न्यूज आहे', 'पुनश्च हनिमून' अशी अनेक नाटकं प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. 


चारचौघी : 'चारचौघी' हे नाटक नुकतचं नव्या संचात रंगभूमीवर आलं आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकात रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आहेत. प्रशांत दळवीने या नाटकाचं लेखन केलं आहे. 
09 ऑक्टोबर - आचार्य अत्रे (कल्याण) दुपारी 4.30 वाजता


दादा एक गुड न्यूज आहे : 'दादा एक गुड न्यूज आहे' हे मराठी रंगभूमीवरील नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या नाटकात आशुतोष गोखले, मृगा बोडस, आरती मोरे आणि उमेश कामत मुख्य भूमिकेत आहेत. तर अद्वैत दादरकरने या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 
08 ऑक्टोबर - गडकरी रंगायतन (ठाणे) रात्री 8.30 वाजता
09 ऑक्टोबर - बालगंधर्व रंगमंदिर (पुणे) सायं. 5.30 वाजता


हौस माझी पुरवा : संतोष पवारच्या 'हौस माझी पुरवा' या नाटकात अभिजीत केळकर, ऋचा मोडक, अमोल सुर्यवंशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 
08 ऑक्टोबर - विष्णुदास भावे (वाशी) दुपारी 4 वाजता
09 ऑक्टोबर - प्र.ठाकरे (बोरिवली) सकाळी 11.30 वाजता


पुनश्च हनिमून : 'पुनश्च हनिमून' या नाटकाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा संदेश कुलकर्णीने सांभाळली आहे. या नाटकात अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी आणि अमित फाळके महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 
08 ऑक्टोबर - प्र.ठाकरे (बोरिवली) दुपारी 4 वाजता


हीच तर फॅमिलीची गंमत आहे : 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या संतोष पवारचं विनोदी नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 
08 ऑक्टोबर - शिवाजी मंदिर (दादर) दुपारी 3.30 वाजता


मी स्वरा आणि ते दोघं : 'मी स्वरा आणि ते दोघं' हे नाटक आदित्य मोडकने लिहिलं असून नितीश पाटणकरने या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. यात नाटकात सुयश टिळक आणि निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत आहेत. 
08 ऑक्टोबर - सावित्रीबाई फुले (डोंबिवली) रात्री 8.30 वाजता
09 ऑक्टोबर - दीनानाथ नाट्यगृह (पार्ले) दुपारी 4 वाजता


हरवलेल्या पत्त्यांचा बंगला : 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' हे नाटक स्वरा मोकाशी यांनी लिहिलं असून चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केलं आहे. या नाटकात प्रतीक्षा लोणकर, दीप्ती लेले, राजन जोशी, अथर्व नाकती आणि वंदना गुप्ते महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
08 ऑक्टोबर - गडकरी रंगायतन (ठाणे) दुपारी 4.30 वाजता


खरं खरं सांग : ऋतुजा देशमुख, सुलेखा तळवळकर, राहुल मेहेंदळे आणि आनंद इंगळे 'खरं खरं सांग' या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 
09 ऑक्टोबर - रवींद्र नाट्य मंदिर (प्रभादेवी) दुपारी 4 वाजता


संज्या छाया : चंद्रकांत कुलकर्णींच्या 'संज्या छाया' या नाटकात वैभव मांगले आणि निर्मिती सावंत मुख्य भूमिकेत आहेत. प्रशांत दळवींनी हे नाटक लिहिलं आहे. 
08 ऑक्टोबर - शिवाजी मंदिर (दादर) रात्री 8 वाजता
09 ऑक्टोबर - गडकरी रंगायतन (ठाणे) दुपारी 4.30 वाजता


38 कृष्ण व्हिला : '38 कृष्ण व्हिला' या नाटकात डॉ. गिरीश ओक, डॉ. श्वेता पेंडसे मुख्य भूमिकेत आहेत. विजय केंकरेंनी दिग्दर्शन केलं आहे. 
09 ऑक्टोबर - प्र. ठाकरे (बोरिवली) दुपारी 4.30 वाजता


संबंधित बातम्या


Marathi Natak : 'चारचौघी' ते 'अलबत्या गलबत्या', वीकेंडला नाट्यरसिकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी


BLOG : एकांकिका करणाऱ्यांचा स्ट्रगल वेगळाच, त्यांना प्रोत्साहन नको का?