Box Office Movies : मनोरंजनसृष्टीसाठी वर्षाची सुरुवात खूपच सुखद झाली आहे. अनेक दर्जेदार सिनेमे या वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. एकीकडे रितेश-जिनिलियाचा (Riteish Deshmukh Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) हा सिनेमा प्रेक्षकांना वेड लावत असताना दुसरीकडे बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून रेकॉर्डब्रेक कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केलं. अशातच 'वाळवी'ने (Vaalvi) 'पठाण'ला पोखरलं. आता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'शहजादा' (Shehzada) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


कार्तिकच्या 'शहजादा'चा 'पठाण'ला फटका बसणार? 


शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. त्यामुळे शाहरुखचं बॉक्स ऑफिसवरचा बादशाह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आता हा सिनेमा रिलीज होऊन 24 दिवस पूर्ण झाले आहेत. 500 कोटींच्या क्लबमध्ये 'पठाण'ची एन्ट्री झाली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 508.35 कोटींची कमाई केली आहे. पण आता कार्तिक आर्यनच्या 'शहजादा'मुळे 'पठाण'ला फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 










कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'शहजादा' (Shehzada) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 7 कोटींची कमाई करत या सिनेमाने सर्वांना थक्क केलं आहे. 85 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ला सिनेमागृहात 50 दिवस पूर्ण!


अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचा 'वेड' हा सिनेमा 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या सिनेमाने सिनेमागृहात 50 दिवसांचा टप्पा पार केला आहे. या ब्लॉकबस्टर सिनेमाने रिलीजच्या 50 दिवसांत 74 कोटींची कमाई केली आहे. सिनेप्रेक्षकांसह रितेश-जिनिलियाचे चाहते पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत. मराठी सिने-रसिकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात या सिनेमाला यश आलं आहे. दरम्यान दुसरीकडे माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर 'वाळवी' (Vaalvi) सिनेमा प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाला आहे. 






शाहरुख खानचा मोठा चाहतावर्ग आहे. लाडक्या सेलिब्रिटाचा सिनेमा चाहते सिनेमागृहात जाऊन पाहत आहेत. तर रितेश-जिनिलाच्या 'वेड' या पहिल्या-वहिल्या मराठी सिनेमाची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. त्यामुळे एकंदरीतच 'होऊ दे चर्चा... सिनेमा आहे घरचा' असं चित्र बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. 


संबंधित बातम्या


बॉक्स ऑफिसवर शाहरुखचा जलवा; पठाण चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील