Box Office Collection : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'धाकड' (Dhaakad) आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या दोन्ही सिनेमांची सध्या बॉक्स ऑफिसवर टक्कर होत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी कंगनाचा 'धाकड' सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. तर 'भूल भुलैया 2'चा चांगलाच बोलबाला पाहायला मिळाला. 

Continues below advertisement


'धाकड'ने केली फक्त एक कोटींची कमाई


कंगनाच्या 'धाकड' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण दुसरीकडे प्रेक्षकांना 'भूल भुलैया 2' ची क्रेझ होती. त्यामुळे प्रेक्षकांनी रिलीजच्या पहिल्या दिवशी  'भूल भुलैया 2' ला पसंती दर्शवली. 'भूल भुलैया 2'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 14.11 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे कंगनाच्या 'धाकड' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी खूपच कमी कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने फक्त एक कोटींचा गल्ला जमवला आहे. 


'धाकड' हा एक अॅक्शन ड्रामा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केलं आहे. या सिनेमात कंगना रनौत, अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने कंगनाने ‘रॉ एजंट’ची भूमिका साकारली आहे. तर 'भूल भुलैया 2' सिनेमाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलं आहे.


'धाकड'मध्ये अॅक्शनचा तडका


कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात कंगनाचा एक वेगळा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सिनेमात कंगनाने एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. 'धाकड' सिनेमा विकेंडला चांगली कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


कंगनाने केले कार्तिक आर्यनचे कौतुक


कंगना रनौतने सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीच्या 'भूल भूलैया 2' सिनेमाचे कौतुक केले आहे. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. कंगनाने 'भूल भूलैया 2' संबंधित पोस्ट केल्यामुळे तिचे चाहतेदेखील तिचे कौतुक करत आहेत.


संबंधित बातम्या


Dhaakad Vs Bhool Bhulaiyaa 2 : कंगना आणि कार्तिकची बॉक्स ऑफिसवर टक्कर, ‘धाकड’ विरुद्ध ‘भुलभुलैया 2’! कोण मारणार बाजी?


Dhaakad, Bhool Bhulaiyaa 2 Online Leaked : बॉलिवूडला पुन्हा एकदा पायरसीचा फटका! रिलीजच्या अवघ्या काही तासांतच ‘धाकड’, ‘भूलभुलैया 2’ लीक!