सोनाचा 'तोरी सुरत' हा म्युझिक व्हिडिओ हटवण्याचा इशारा मदारिया सुफी फाऊण्डेशनने मेल करुन दिला आहे. हे गाणं सेन्सॉर बोर्डाकडून संमत करण्यात आल्याचं सोनाने सांगितलं आहे. सोना मोहापात्राने ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे..
'तोरी सुरत' हे गाणं अश्लील असल्याचा दावा मदारिया सुफी फाऊण्डेशनने केल्याचं सोनाने सांगितलं. त्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत मदारिया सुफी फाऊण्डेशनने धमकी दिल्याचा आरोप सोनाने केला आहे.
सोना मोहापात्राचं ट्वीट
मुंबई पोलिस आयुक्त, मला मदारिया सुफी फाऊण्डेशनकडून धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डाने संमत केलेला म्युझिक व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी यात करण्यात आली आहे.
सलमान खान कॉन्ट्रोव्हर्सीच्या वेळीही मला बलात्कार, अॅसिड अटॅक आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, तेव्हा मुंबई पोलिसांना मी माझा संपर्क क्रमांक दिला होता. पण कोणतीही मदत माझ्यापर्यंत पोहचली नाही, हे सांगताना मला खेद होतो. मी सुरक्षित आहे, हेच सुदैव. मी जवळच्या पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मार्गदर्शनाबद्दल आभार.