Gudi Padwa 2023 : चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. आज सर्वत्र गुढीपाडव्याच्या उत्साह पाहायला मिळत आहे. आनंदाची, सुखसमृद्धी आणि भरभराटीची गुढी आज घरा-घरांत उभारली जात आहे. अशातच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनपासून (Amitabh Bachchan) ते हेमा मालिनीपर्यंत (Hema Malini) अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना पुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजय देवगणने दिल्या शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'भोला' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातच त्याने ट्वीट करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने मराठीत ट्वीट केलं आहे,"नमस्कार! सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा".
अमिताभ बच्चनने चाहत्यांना दिल्या शुभेच्छा
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेमा मालिनी शुभेच्छा देत म्हणाल्या...
ड्रीम गर्ल हेमा मालिनीने ट्वीट केलं आहे की, नववर्षाचं स्वागत करणाऱ्या सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तुमचा प्रत्येक दिवस आनंदात जावो".
उर्मिला मातोंडकरच्या ट्वीने वेधलं लक्ष
उर्मिला मातोंडकरने ट्वीट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिने ट्वीट केलं आहे, "गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!! जुन्या दु:खांना मागे सोडून स्वागत करा नववर्षाचे...गुढीपाडवा घेऊन येतो क्षण प्रगती आणि हर्षाचे".
महेश बाबूंनी चाहत्यांना दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांनीदेखील ट्वीट करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट केलं आहे,"तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या शुभेच्छा खूप-खूप शुभेच्छा".
संबंधित बातम्या