Anupam Kher:राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज  २८८ मतदारसंघात मतदान होत आहे. सकाळपासून मुंबईतील मतदानकेंद्रांमध्ये सेलिब्रेटींचंही मतदान सुरु आहे. बॉलिवूडच्या दिग्गजांनीही आपापल्या विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला आहे.  बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनीही मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी तरुण मतदारांना मतदान करणं कुल आहे. त्यामुळं कुल बना असं त्यांच्या भाषेत अनुपम खेर यांनी ANIशी बोलताना सांगितलं.


...त्यांना तक्रार करायचा अधिकार नाही


प्रत्येकाला इन्फास्ट्रक्चर हवं असतं. आयुष्य सोपं व्हावं असं वाटत असतं. त्यासाठीच सगळेजण मतदान करतात. पण जे यावेळी मतदान करणार नाहीत त्यांना मतदान करण्याचा काहीही अधिकार नाही. पण लोकशाहीनं तुम्हाला तुमच्या आवडीच्या नेत्याला, पक्षाला निवडण्याचा अधिकार दिला आहे. त्या अधिकाराचा पूर्ण उपयोग करायला हवा. जर मतदान न करता मग इंन्फ्रास्ट्रक्चर किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्ही तक्रार करत असाल तर मात्र तुम्हाला तो अधिकार नाही. असं अनुपम खेर म्हणाले.


तरुणांना म्हणाले कुल बना...


आपल्या उज्वल भविष्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी आणि खास करून जे पहिल्यांना मतदान करणार आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की, मतदान केंद्रात जाऊन आपलं मत देणं ही अतिशय कूल गोष्ट आहे. त्यामुळं कूल बना. असं अनुपम खेर यांनी सांगितलं.


बॉलिवूड दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार


अभिनेता-चित्रपट निर्माता फरहान अख्तरने वांद्रे येथील मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले. सलमान खानचे वडील लेखक सलीम खान आणि त्यांची पत्नी यांनीही मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. तर लोकप्रीय गीतकार गुलाजार आणि त्यांची मुलगी मेघना गुलजार यांनीही मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून मुंबईत गीतकार गुलजारांसह, फरहान अख्तर, सलीम खान, राजकुमार राव अशा दिग्गजांनी मतदान करत आपला हक्क बजावल्याचं दिसलं.  


मतदान आता भुलणार नाहीत- गुलजार




सामान्य माणसाला अतिशय ग्लॅमरस गिफ्ट दाखवले जात आहेत. त्यांना हा धनत्रयोदशी वाटतं. सामान्य माणूस या बेहकाव्यात येणार नाही. त्याचं हीत त्याला कळतं. त्यामुळं माझी अशी आशा आहे की तो अशाच व्यक्तीला मत देईल जो त्याचे प्रश्न सोडवेल.असं गुलजार म्हणाले.