Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi 4) एक वेगळा चाहतावर्ग आहे. पण प्रेक्षकांमध्ये बिग बॉस मराठीची क्रेझ कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील हा वादग्रस्त कार्यक्रम मागे पडला आहे. नुकतेच स्पर्धकांमध्ये 'विषय END' हे नॉमिनेशन कार्य पार पडले. या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेत यशश्री, स्नेहलता, प्रसाद, रुचिरा, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी हे सदस्य नॉमिनेट झाले. 


बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सिनियर्स VS जुनिअर्स हे साप्ताहिक हे कार्य रंगणार आहे. ज्यामध्ये सिनिअर्सना जुनिअर्स टीमचा सिनेमाला जाण्याचा प्लॅन उधळून लावायचा आहे. आता कोणती टीम बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 






अक्षय आणि टीम B ने मिळून रुचिराला नॉमिनेट केले. आज रुचिरा - रोहितमध्ये तसेच अपूर्वा आणि समृद्धी मध्ये चर्चा रंगणार आहे. अपूर्वा समृद्धीला सांगताना दिसणार आहे, माझ्या आणि प्रसादच्या वादात मी देशमुखला काय म्हणाले, स्टे आऊट ऑफ दिस. विषय माझा आणि त्याचा आहे. आम्ही ते बघून घेऊ. तुला विचारलं आहे का?". 


दुसरीकडे रुचिरा आणि रोहितची नॉमिनेशन वरून चर्चा रंगली आहे. रुचिराचे म्हणणे आहे,"साप्ताहिक कार्याची कामगिरीत जो निकष दिलाच नव्हता त्या नसलेल्या निकषावर त्यांनी मला नॉमिनेट केलं आहे". अपूर्वा समृद्धीला सांगताना दिसणार आहे, जेव्हा मी नॉमिनेट झाले होते तेव्हा किती लोकं आली होती. केवढे लोकं येऊन बोले होते माझ्या बाजूने. मी माझ्या प्रॉब्लेमला केलं ना डील माझं. समृद्धीचे म्हणणे आहे, सगळेच करतात मी पण केलं".


'बिग बॉस'च्या घरातून कॉमन मॅनची एक्झिट


त्रिशूल मराठे बिग बॉसच्या घरातून आऊट झाला आहे. बिग बॉसच्या घरात नेहमीच स्पर्धक म्हणून सेलिब्रिटी सहभागी होत असतात. पण या पर्वात पहिल्यांदाच सामान्य नागरिक म्हणून त्रिशूल मराठे सहभागी झाला होता. त्यानिमित्ताने एका सामान्य चाहत्याला पहिल्यांदाच बिग बॉसचा खेळ खेळण्याची संधी मिळाली होती. त्रिशूलने पहिल्याच दिवशी महेश मांजरेकरांचं मन जिंकलं होतं. पण मागच्या काही दिवसांत तो कमी खेळताना दिसून आला. एका चांगल्या माणसाला घराबाहेर जावं लागत आहे, असं म्हणत मांजरेकरांनी त्रिशूलचा निरोप घेतला.


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 4: टीम A विरुध्द्व टीम B; बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार 'विषय END' नॉमिनेशन कार्य