Bhargavi Chirmuley : मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने (Bhargavi Chirmuley) आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता भार्गवी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. 'येतोय तो खातोय' (Yetoy To Khatoy) हे तिचं नवं नाटक (Marathi Natak) रंगभूमीवर दाखल झालं आहे. हे लोकनाट्य असल्याने भार्गवीचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'येतोय तो खातोय' या नाटकात (Drama) भार्गवी 'राधा'च्या (Radha) भूमिकेत दिसणार आहे. तिची ही भूमिका सर्वसामान्यांचे प्रतीक आहे. या नाटकात भार्गवीचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळणार आहे. 'येतोय तो खातोय' या लोकनाट्यात अभिनय आणि नृत्य यांचा मिलाफ असल्याने अभिनय आणि नृत्याची आवड एकत्रित दाखवता येत असल्याचा आनंद भार्गवी व्यक्त करते. हे लोकनाट्य आधुनिक पद्धतीने मांडण्यात आलं आहे. गण, गवळण, लावणी, कटाव असे सर्व प्रकार या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.
'येतोय तो खातोय'बद्दल भार्गवी म्हणाली...
'येतोय तो खातोय' (Bhargavi Chirmuley Marathi Natak) या नाटकाबद्दल बोलताना भार्गवी म्हणाली, "आजपर्यंत मी गावरान ठसक्याच्या भूमिका केल्या नव्हत्या. 'येतोय तो खातोय' या नाटकाच्या निमित्ताने अशी वेगळी भूमिका करण्याची संधी मला मिळाली. ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती".
भार्गवी पुढे म्हणाली,"येतोय तो खातोय' या नाटकासाठी भाषेचा लहेजा खूप महत्त्वाचा होता. त्यासाठी मी बरीच मेहनत घेतली असून माझ्या भूमिकेतून गावरान भाषेचा गोडवा रसिकांना अनुभवयाला मिळेल. या नाटकासाठी मी खूप उत्सुक आहे".
तगडी स्टारकास्ट असलेलं 'येतोय तो खातोय'
ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर लिखित आणि हृषिकेश जोशी (Hrishikesh Joshi) दिग्दर्शित 'येतोय तो खातोय' (Yetoy To Khatoy) या नाटकात भार्गवी चिरमुले सोबत हृषिकेश जोशी, संतोष पवार, स्वप्नील राजशेखर, अधोक्षज कऱ्हाडे, मयुरा रानडे, सलीम मुल्ला, ऋषिकेश वांबुरकर, महेंद्र वाळुंज हे कलाकार असणार आहेत. सध्या घडणाऱ्या सामाजिक आणि राजकीय घडामोडीवर हसता हसता विचार करायला भाग पाडणारं असं हे नाटक प्रत्येकजण रिलेट करेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :