Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser Released : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाचा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमाच्या रिलीजसोबत 'किसी का भाई किसी की जान'चा टीझर आऊट करण्यात आला आहे. 


'किसी का भाई किसी की जान'च्या टीझरला थोडा साऊथ टच देण्यात आला आहे. सलमानच्या दाक्षिणात्य लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 1 मिनिट 43 सेकंदाच्या 'किसी का भाई किसी की जान'च्या टीझरमध्ये हाय-वोल्टेजमध्ये अॅक्शन दाखवण्यात आलं आहे. भाईजानसह दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे आणि वेंकटेश दग्गुबातीची झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 


'किसी का भाई किसी की जान'च्या टीझरवरुन सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन, रोमान्स, कॉमेडीसह मनोरंजनाची मेजवानी मिळणार असल्याचा अंदाज येत आहे. "मेरा कोई नाम नही लेकीन में 'भाईजान' नामसे जाना चाहता हॅूं", असे या सिनेमातील डायलॉग प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे आहेत. 


सलमानने शेअर केला टीझर...


सलमानने सोशल मीडियावर टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"चांगल्या गोष्टीचं चांगलच होणार आणि वाईट गोष्टीचं वाईट होणार". सलमानच्या टीझरवर चाहते कमेंट्स करत टीझर आवडला असल्याचं सांगत आहे. 'किसी का भाई किसी की जान' ब्लॉकबस्टर होणार, आपला भाऊ येतोय, आता सिनेमाची प्रतीक्षा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.  






'किसी का भाई किसी की जान' प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार? 


सलमान खान 'अंतिम' या सिनेमात शेवटचा दिसला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. भाईजानने गेल्या काही दिवसांपूर्वी 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाची घोषणा केली होती. हा सिनेमा 21 एप्रिल 2023 रोजी म्हणजेच ईदच्या मुहुर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Salman Khan : लांबलचक केस, लेदर जॅकेट अन् काळा चष्मा; 'किसी का भाई किसी की जान'मधील भाईजानचा हटके लूक समोर