Prasad Kambli On Bhadrakali Studios : मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या धाटणीची नाटकं रसिकांच्या भेटीसाठी आणणाऱ्या भद्रकाली प्रोडक्शनने सीमोल्लंघन केले आहे. भद्रकाली प्रोडक्शनने आता आपला मोर्चा वेब सीरिज, चित्रपट, मालिकांकडे वळवला आहे. त्यासाठी भद्रकाली स्टुडिओची घोषणा 'भद्रकाली'चे प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते, निर्माते मच्छिंद्र कांबळी यांनी 'भद्रकाली'ची सुरुवात केली होती. त्यांच्या पश्चात प्रसाद कांबळी यांनी भद्रकालीची धुरा यशस्वीपणे सांभाळली असून त्याचा आता विस्तार केला आहे.
प्रसाद कांबळी म्हणाले,"गेलं वर्षभर 'भद्रकाली स्टुडिओज'वर काम सुरू आहे. प्रेक्षकांना चांगला आशय हवा आहे. त्यामुळे चांगला आशय असणाऱ्या कलाकृती देण्याचा प्रयत्न 'भद्रकाली स्टुडिओज' मार्फत केला जाणार आहे. विनोदी नाटकांसोबत सामाजिक भान जपणारी नाटकं भद्रकालीने दिली आहेत. त्याचप्रकारे 'भद्रकाली स्टुडिओज'मार्फतदेखील अशाच पद्धतीच्या कॉन्टेंट देण्यात येईल".
प्रसाद कांबळी पुढे म्हणाले,"येणाऱ्या काळाचा विचार करुन ओटीटी, सिनेमे, टीव्ही या सर्व माध्यमातून भद्रकालीने सीमोल्लंघन केलं आहे. मालवणी सिनेमे पाहण्याची प्रेक्षक इच्छा व्यक्त करत आहेत. नाटकांप्रमाणे वेग-वेगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न भद्रकाली स्टुडिओजतर्फे होणार आहे. प्रेक्षकांची अभिरुची सातत्याने बदलत असते. त्यादृष्टीने अभिरुची संपन्न आशय देण्याचं काम भद्रकाली स्टुडीओज करेल. लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाईल".
नवीन टॅलेंटला संधी
'भद्रकाली स्टुडिओज' मार्फत थोर साहित्यकांच्या कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. वेबसीरिज, सिनेमे, टीव्ही अशा सर्वच गोष्टींचा यात समावेश असेल. नविन लेखक आणि तरुणांना 'भद्रकाली स्टुडिओज' संधी देणार आहे. 'नविन टॅलेंट आणि जुन्याचा मिलाप' अशा स्वरुपात 'भद्रकाली स्टुडिओज' काम करणार आहे.
भद्रकाली प्रोडक्शनची नाटकं -
- अग्निदव्य
- अफलातून
- केला तुकानी झाला माका
घास रे रामा - चाकरमानी
- पप्पा सांगा कुणाचे
- पांडगो इलो रे इलो
- भय्या हातपाय पसरी
- भारत भाग्यविधाता
- मालवणी सौभद्र
- मेड फॉर ईच अदर
- म्हातारे जमींपर
- येवा, कोंकण आपलाच असा
- रातराणी
- रामा तुझी माऊली
- वस्त्रहरण
- संशयकल्लोळ
- सुखाशी भांडतो आम्ही
- संगीत देवबाभळी
संबंधित बातम्या