RRR Beats Top Gun Maverick : 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा रिलीजझाल्यापासून चर्चेत आहे. अद्याप या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्ड करत आहे. आता हा सिनेमा ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीनच्या या वर्षातील टॉप 50 सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे.


एसएस राजामौलींचा (SS Rajamouli) 'आरआरआर' हा सिनेमा ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीनच्या यादीत नवव्या स्थानावर आहे. राजामौलींनी टॉम क्रूझच्या 'टॉप गन मेव्हरिक' या सिनेमाला मागे टाकलं आहे. हा सिनेमा यादीत 38 व्या क्रमांकावर आहे. 


ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीन दरवर्षी वर्षभरातील सर्वोत्कृष्ट 50 सिनेमांची यादी जाहीर करतात. या यादीत स्कॉटिश सिने दिग्दर्शक चोर्लोट वेल्स दिग्दर्शित 'आफ्टर सन' या सिनेमाने बाजी मारली आहे. हा सिनेमा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. 






ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीनच्या यादीत समावेश होण्यासोबत 'आरआरआर' सिनेमाने आणखी दोन पुरस्कार पटकावले आहेत. या सिनेमाने 'सर्वोत्कृष्ट विदेशी भाषा चित्रपट 2022' आणि 'गोल्डन ग्लोब' अशा दोन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. 


'आरआरआर' या सिनेमाला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने बाजी मारली आहे. सर्वत्र या सिनेमाचे कौतुक होत आहे. पुढील वर्षी हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात येणार आहे. 


'आरआरआर' या सिनेमात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा मार्चमध्ये तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळ आणि हिंदीत सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. एसएस राजामौलींनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


संबंधित बातम्या


Critics Choice Awards 2023: आरआरआरच्या यशाची घोडदौड सुरुच; क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्समध्ये मिळाली 5 नामांकने