Chatrapathi Poster: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभास (Prabhas) छत्रपती (Chatrapathi) हा तेलुगू चित्रपट 2005 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांनी केलं. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक रिलीज होणार आहे. छत्रपती चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे नाव देखील छत्रपती हेच असणार आहे. नुकताच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाला आहे. या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


'हा' अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका 


अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवास (Bellamkonda Sreenivas)  हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. बेल्लमकोंडा श्रीनिवासनं अल्लुदु अधुर्स, सीता, या तेलुगू चित्रपटामध्ये काम केलं. आता तो छत्रपती या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. छत्रपती या चित्रपटाच्या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. बेल्लमकोंडा श्रीनिवास हा छत्रपती या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शर्टलेस लूकमध्ये दिसत आहे. 


छत्रपती चित्रपटाची स्टार कास्ट 


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुच्चा ही छत्रपती या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. तिनं 2010 मध्ये ताजमहाल या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण केले होतं. तसेच नुसरत  आणि बेल्लमकोंडा श्रीनिवास  यांच्यासोबतच साहिल वैद, अमित नायर, राजेंद्र गुप्ता, शिवम पाटील, स्वप्नील, आशिष सिंग, मोहम्मद मोनाजीर, आरोशिका डे, वेदिका, जेसन हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 12  मे 2023 रोजी छत्रपती चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


पाहा पोस्टर 



छत्रपती चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन व्ही.व्ही.विनायक करत आहेत. जयंतीलाल गडा यांचे पेन स्टुडिओज या चित्रपटाचे निर्मिते आहेत. व्ही.व्ही.विनायक यांनी याआधी  लक्ष्मी (2006), अधर्स (2010)  आणि कैदी नंबर 150 (2017)  यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. आता त्यांच्या छत्रपती या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. छत्रपती या चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाली असून पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सध्या सुरू आहे. तनिष्क बागची या चित्रपटाचे संगीतकार आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Mahesh Babu : महेश बाबूचा किलर स्वॅग; 'SSMB28'ची रिलीज डेट जाहीर, पोस्टरनं वेधलं चाहत्यांचं लक्ष