Ayushmann Khurrana On UNICEF India National Ambassador : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या चर्चेत आहे. युनिसेफ इंडियाच्या (UNICEF India) वतीने आयुष्मानची राष्ट्रीय सदिष्छा दूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेत्याने अनेक गरजू मुलांची मदत करण्यासाठी युनिसेफशी हातमिळवणी केली आहे. 


सदिष्छा दूतपदी नियुक्ती झाल्यानंतर आयुष्मान खुराना म्हणाला,"युनिसेफ इंडियाच्या माध्यमातून अनेक गरजू मुलांच्या हक्कासाठी मला प्रयत्न करता येणार आहे. तसेच माझ्या देशातील लहान मुलांसह किशोरवयीन मुलांच्या समस्यादेशील सोडवता येतील. मी युनिसेफ इंडियाचा सेलिब्रिटी वकील म्हणून मुलांसोबत संवाद साधला आहे. त्यावेळी मी इंटरनेट, सुरक्षा, सायबर बुलिंग, मानसिक आरोग्य आणि लैंगिक समानता विषयासंदर्भात मी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. आता युनिसेफसोबत एका वेगळ्या नात्याने मी जोडलो गेलो आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 


युनिसेफसोबत 2 वर्षांपासून जोडला गेलाय आयुष्मान खुराना!


आयुष्मान खुरानाची आता युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय सदिच्छा दूतपदी नियुक्ती झाली असली तरी गेल्या दोन वर्षांपासून तो या संस्थेशी जोडला गेला आहे. लहान मुलांवरील हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी आणि बालहक्कांसाठी आयुष्मानने युनिसेफ इंडियाचा सेलिब्रिटी वकील म्हणून काम केलं आहे. 'जागतिक बाल दिन', 'आंतरराष्ट्रीय महिला दिन', आंतरराष्ट्रीय बालिका दिन' या खास दिवशी आयुष्मान युनिसेफ इंडियाच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झाला आहे. 


युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय सदिच्छा दूतपदी नियुक्ती झाल्यानंतर आयुष्मानने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. आयुष्मानने लिहिलं आहे,"राष्ट्रीय सदिच्छा दूतपदी नियुक्ती केल्याबद्दल युनिसेफ इंडियाचे आभार...मी गेल्या दोन वर्षांपासून युनिसेफशी जोडला गेलो आहे. त्यामुळे त्यांचं काम मी जवळून अनुभवलं आहे. आता देशातील प्रत्येत मुलाच्या हक्कांसाठी मी प्रयत्न करणार आहे". 






प्रियंका चोप्रादेखील आहे सदिच्छा दूत


बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गेल्या 15 वर्षांपासून युनिसेफ इंडियासोबत जोडली गेली आहे. यासंस्थेच्या माध्यमातून ती मुलींच्या अडचणी, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियंका 2006 साली या संस्थेसोबत जोडली गेली असली तरी 2016 साली तिची 'ग्लोबल यूनिसेफ गुडविल अॅम्बेसिडर' म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Happy Birthday Ayushmann Khurrana :  अभिनेताच नाही तर, गायक अन् व्हीजेदेखील आहे आयुष्मान खुराना! वाचा अभिनेत्याविषयी खास गोष्टी...